नागपूर -महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ. शैलू गंटावार यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर महापालिकेच्या तब्बल 5 दिवस चाललेल्या मॅरेथॉन सर्वसाधारण सभेच्या अंतिम दिवशी महापौर संदीप जोशी यांनी हा निर्णय दिला.
या डॉक्टर दाम्पत्यांच्या नियुक्तीवर अनेक नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर माहापौरांनी चौकशीचे निर्देश देत पुढील आदेशपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले. सोबतच महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अनेक निर्णयाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीचे गठन करण्यात आली आहे. 6 जुलैपर्यंत या चौकशी समिती समोर आयुक्तांनी त्यांचे स्पष्टीकरण द्यावे, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांना निर्देश देण्यात आले आहेत.
बोलताना महापौर संदीप जोशी तुकाराम मुंढे हे स्थायी समितीची परवानगी न घेता सुट्टीवर गेले. सभागृहाची परवानगी न घेता प्रसार माध्यमे व समाज माध्यंमावर वेळोवेळी आयुक्त प्रकट झाले. कार्यादेश निघालेली विकासकामे थांबवणे. महापालिकेत काही कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नियुक्ती करणे, याबाबत स्थायी समितीने स्पष्टीकरण मागितले आहेत, अशी माहिती महपौर जोशी यांनी दिली.
काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी महापालिका राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचेही महापौर जोशी यांनी सभागृहात जाहीर केले. महापालिकेच्या इतिहासात सभागृह पहिल्यांदाच पाच दिवस चालले. सभागृहात काँग्रेस नगरसेवकांना बोलू देत नसल्याचा आरोप करत काँग्रेसने सभात्याग केला. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांच्या चर्चेला उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले.
हेही वाचा -आयुक्तांविरोधात स्थगन प्रस्ताव दिल्याने नगरसेवकाला काँग्रेस पक्षाने बजावली नोटीस