विशेष - ग्रँडमास्टर दिव्या देशमुखची बुद्धिबळ ओलिम्पियाडसाठी भारतीय संघात निवड
दिव्याला भारतीय संघाच्या 'ब' गटाची कर्णधार म्ह्णून निवडण्यात आले आहे. तिच्या सोबत वंतीक अग्रवाल, सौम्य स्वामिनाथन, मेरी गोम्स, आणि पद्मिनी राऊत या खेळाडूंचा समावेश आहे. दिव्याला बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी स्पर्धेसाठी निवड होण्याचा पूर्ण विश्वास होता,दिव्याने तिच्या खेळातील उत्कृष्ट कामगीरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. भारतीय संघात निवड झाल्याची बातमी मिळाल्यापासून दिव्याला अभिनंदनासाठी फोन येत असले तरी ती मात्र स्पर्धेसाठी सराव करण्यात मग्न झाली आहे.
नागपूर -चेन्नई येथील महाबलीपुरम येथे आयोजित होणाऱ्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी स्पर्धेसाठी भारतीय बुद्धिबळ संघाच्या 'ब' गटात नागपूरची कन्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुखची निवड झाली आहे. 28 जुलै पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पाच वेळचे विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना भारतीय संघाचा मेंनटॉर म्हणून नियुक्त करण्यात आल्यामुळे भारतीय बुद्धिबळ खेळाडूंना विश्वनाथन आनंद यांच्याकडून डावपेच शिकण्याची संधी मिळणार असल्याने दिव्या देशमुख फारचं उत्साही झाली आहे. या आधी सुद्धा दिव्याला विश्वनाथन आनंद यांच्याकडून बुद्धिबळाचे धडे मिळाले आहेत.
रौनक सदवानी या खेळाडूची सुद्धा बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी निवड - दिव्या देशमुख सोबत नागपूरच्या रौनक सदवानी या खेळाडूची सुद्धा बुद्धिबळ ओलिम्पियाडसाठी निवड झाली आहे. तो सध्या सरावासाठी मुंबईला गेलेला आहे. रौनकच्या संघात निहाल सरीन, डी.गुकेश,बी अधिबान आणि आर प्रज्ञानंद या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत जगातील शेकडो देशाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. मानाच्या बुद्धिबळ ओलिम्पियाडसाठी दिव्याची निवड झाल्याने ती आनंदी झाली आहे.
दिव्या 'ब' गटाची कर्णधार -दिव्याला भारतीय संघाच्या 'ब' गटाची कर्णधार म्ह्णून निवडण्यात आले आहे. तिच्या सोबत वंतीक अग्रवाल, सौम्य स्वामिनाथन, मेरी गोम्स, आणि पद्मिनी राऊत या खेळाडूंचा समावेश आहे. दिव्याला बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी स्पर्धेसाठी निवड होण्याचा पूर्ण विश्वास होता,दिव्याने तिच्या खेळातील उत्कृष्ट कामगीरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. भारतीय संघात निवड झाल्याची बातमी मिळाल्यापासून दिव्याला अभिनंदनासाठी फोन येत असले तरी ती मात्र स्पर्धेसाठी सराव करण्यात मग्न झाली आहे.
दिव्याकडून नागपूरकरांना मोठ्या अपेक्षा -दिव्याकडून केवळ नागपुरकरांनाचं नाही तर देशाच्या अपेक्षा आहेत. तीने बालवयातचं ग्रँडमास्टरच्या खिताबाला गवसणी घातली असल्याने तिच्याकडून नक्कीच पदकांची अपेक्षा आहे. अपेक्षांचे ओझे फार जड असल्याची जाणीव दिव्याला आहे,त्यामुळेचं तिने आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.
भारताला मिळालेले पदके -२०१४ साली झालेल्या बुद्धिबळ ओलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला कांस्य पदक मिळाले होते. तर 2020 मध्ये भारताच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली होती. तर गेल्यावर्षी भारतीय महिला संघाला कांस्य पदक प्राप्त झाले होते.