नागपूर - नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मतदार होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक अंतर्गत नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३२२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर मतदारांची वाढलेली संख्या आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता दोन सहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ करण्यात आली आहे. सर्व पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत. एकूण दोन लाख सहा हजार मतदार आहेत.
सध्या कोरोनाचे संकट राज्यावर आहे. यात पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुका होत आहेत. यात मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर करताना मतदारांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे. कोरोना संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. नागपूर जिल्हातील केंद्रांची संख्या आता १६२ वरून १६४ करण्यात आली आहे. तर भंडारा जिल्ह्यांमध्ये ३१, गोंदिया जिल्ह्यामध्ये २१, वर्धा जिल्ह्यामध्ये ३५, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५०, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये २१ असे एकूण ३२२ मतदान केंद्र आहेत.
वयोरुद्ध आणि दिव्यांगांनी बजावले टपाली मतदान