नागपूर - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाचे पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले आहे. तर नावेगावखैरी धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मान्सूनला विलंब झाल्यास नागपूर शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर शहरावर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढवणार, केवळ ४० दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक - नागपूर
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा संपलेला असून मृतसाठ्यापर्यंत पाण्याने तळ गाठला आहे. सध्या शहराला नावेगावखैरी धरणातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. या धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो केवळ ४० दिवस पुरणार आहे.
शहरासह जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्रोत असतानादेखील भविष्यात नागपूर शहरावर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील उपयुक्त जलसाठा संपलेला असून मृतसाठ्यापर्यंत पाण्याने तळ गाठला आहे. सध्या शहराला नावेगावखैरी धरणातून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. या धरणात ३०६ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक असला तरी तो केवळ ४० दिवस पुरणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना कपात करण्याची सूचना महापालिकेला देण्यात आली आहे.
महापालिकेने पाणी कपातीसंदर्भात अद्यापही कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. मात्र, नागपूरकरांनी भविष्याचा वेध घेऊनच पाण्याचे नियोजन करावे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.