नागपूर - एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर चिठ्ठी फेकून कविता लिहून प्रेम व्यक्त करणे किंवा 'आय लव्ह यू' म्हणने हे कृत्य म्हणजे महिलेचा विनयभंगाचा गुन्हा असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिला. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणी आरोपीला दंड ठोठावत दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
हेही वाचा -नागपूरच्या अजनीत पुन्हा खुनी संघर्ष; दोघे गंभीर जखमी
हे प्रकरण 2011 चे असून यात अकोल्याचा रहवासी असलेला 54 वर्षीय श्रीकृष्ण टावरी हा घरकाम करत असताना विवाहित महिलेला चिठ्ठी देण्यासाठी गेला. यावेळी विवाहित महिलेने ही चिठ्ठी घेण्यास मनाई केली. यामुळे ती चिठ्ठी अंगावर फेकून देत टावरी निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने अश्लील हातवारे केले. यापूर्वीही त्याने विवाहित महिलेला एक मुलगा असताना सुद्धा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे संतप्त महिलेने हा त्रास वाढत असल्याने टावरी विरोधात पोलिसात तक्रार दिली. यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सेशन कोर्टाने आरोपी टावरीला दोन वर्षे सक्त मजुरीसह 40 हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.
या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे आरोपीने दिलासा मिळण्यासाठी अर्ज केला. यात सुनावणी झाली असता न्यायमूर्ती रोहित देव यांनी दोन्ही पक्षांची बाजू एकूण घेतली. यात महिलेची इज्जत म्हणजे तिचा मौल्यवान दागिना असतो. यामुळे एखाद्या विवाहित महिलेसोबत लगट करून चिठ्ठी फेकून मारणे, प्रेम व्यक्त करताना तिचे शीलभंग करणे म्हणजे तिचा विनयभंग करणे होय. यासाठी विशिष्ट परिभाषा नसली तरी हा गुन्हा आहे, असा निर्वाळा न्यायमूर्ती रोहित देव यांनी देत 54 वर्षीय आरोपीला 2 वर्षे कारावासाच्या शिक्षेदरम्यान 45 दिवस कारावास हा पुरेसा असल्याचे म्हटले. यात मात्र दंडाची रक्कम 40 हजार ऐवजी 50 हजार करण्यात आली. ही रक्कम पीडित महिलेला देण्यात येईल, असेही निर्णयात सांगण्यात आले.
हेही वाचा -विदर्भवाद्यांनी सरकार मेले म्हणत केले मुंडन; पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना वाहिली श्रद्धांजली