महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा; नवीन स्रोत वाढविण्याची तयारी सुरू - oxygen stock in Nagpur

बुट्टीबोरी एमआयडीसी येथील दोन तसेच शहरातील 5 अशा एकूण 7 ठिकाणांहून 140 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन पुरवठा होत आहे. पण नागपूर जिल्ह्याला 170 ते 180 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. यामुळे 40 मेट्रिक टन ऑक्सिजन इतर ठिकाणाहून मागविला जात आहे.

oxygen supply In Nagpur
नागपुरात ऑक्सिजनचा तुटडा

By

Published : Apr 22, 2021, 5:09 PM IST

Updated : Apr 22, 2021, 5:33 PM IST

नागपूर -नागपूरात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण होत आहे. पण भविष्यातील गरज पाहता बाहेरुन मिळणारा पुरवठा मिळण्यास कमी झाल्यास जिल्ह्यातच ऑक्सिजन तयार करण्यासाठी नवीन स्रोत शोधले जात आहेत.

बुट्टीबोरी एमआयडीसी येथील दोन तसेच शहरातील 5 अशा एकूण 7 ठिकाणांहून 140 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन पुरवठा होत आहे. पण नागपूर जिल्ह्याला 170 ते 180 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. यामुळे 40 मेट्रिक टन ऑक्सिजन इतर ठिकाणाहून मागविला जात आहे.

नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा

हेही वाचा-ऑक्सिजन ट्रेन विशाखापट्टणमला दाखल, आज रात्री महाराष्ट्राकडे होणार रवाना


ऑक्सिजनचे वितरण हे केवळ वैद्यकीय वाटपासाठी-
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णाच्या तुलनेत ऑक्सजनची गरज आणि मागणी वाढत चालली आहे. शहरात कंपन्यांनी ऑक्सिजन निर्माण करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑक्सिजन वितरणासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियोजन केले जात आहे. ऑक्सिजनचे वितरण हे केवळ वैद्यकीय वाटपासाठी केले जात आहे. यात जिल्ह्यातील 139 कोविड हॉस्पिटल आणि त्यानंतर इतर जीवन वाचवण्यासाठीची गरज लक्षात घेऊन त्यानुसार ऑक्सिजनचा साठा दिला जात आहे. 7 ऑक्सिजन निर्माण कंपनीतून नागपूर जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावतीसह छिंदवाड्यालाही ऑक्सिजन पुरविला जात आहे.

हेही वाचा-जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या 80 जम्बो सिलिंडरचा बॅकअप!

ऑक्सिजन शहरात निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न-
भविष्यातील गरज पाहता ऑक्सिजन शहरात निर्माण व्हावा असे नियोजन करताना डब्ल्यूसिएल, खापरखेडा, कोराडी येथील औष्णिक केंद्रावरून ऑक्सिजन व्यवस्था केली जात आहे. यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले जात आहे. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मागवले जात आहे. या प्रयत्नातून शहराची दैनंदिन वाढती गरज भागविण्यासाठी नियोजन केले जात आहे. भविष्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ऑक्सिजन वाढवण्यासाठी औद्योगिक वसाहतीत नवीन ऑक्सिजन केंद्र निर्मिती करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. थर्मल पॉवर स्टेशन, ओपन एअर प्लॅन्ट, लिक्विड ऑक्सिजन साठा, लिक्विड ऑक्सिजन साठवणूक केली जात आहे. जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींचीसुद्धा मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र ठाकरे यांनी सांगितले.


रुग्णालयांना असा केला आहे ऑक्सिजन पुरवठा-
जिल्ह्यातील जवळपास 139 कोविड हॉस्पीटल आहेत. यात मेयो आणि मेडिकल रुग्णालयाला जवळपास 40 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये 11 शासकीय कोविड हॉस्पीटलमध्ये 61.5 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन तर खासगी 170 रुग्णालयांना सुमारे 8 हजार 622 जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा-ऑक्सिजनचा पुरवठा कमी करण्याचा केंद्राचा निर्णय नागपूर खंडपीठाकडून रद्द, राज्य सरकारलाही फटकारले


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून 5 टँकर ऑक्सिजन उपल्बध

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आगामी 10 दिवसात 5 ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्यासाठी निजोजन केले आहे. एक दिवसाआड एक टँकर रायपूर येथील सिलतराच्या जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लॅन्टमधून प्राप्त होणार आहे. या वाहतुकीसाठी जेएसडब्ल्यू मदत करणार आहे. यावेळी जयस्वाल्स निको लि. कंपनीचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल, तसेच जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याकडून मोलाची मदत मिळाली आहे.

Last Updated : Apr 22, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details