नागपूर - माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा गाडीला जाम चौरजवळ भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालकाचासह एका सीआरपीफ जवानाचा मृत्यू झाला आहे. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कांढळी परिसरातील पूल ओलांडत असताना चंद्रपुरहून नागपूरच्या दिशेने येताना हा अपघात झाला. जखमींवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयत उपचार सुरू आहेत.
विनोद विठ्ठल (वय-३७) असे चालकाचे नाव असून, फाजल भाई पटेल यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच इतर ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.