नागपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज मोठी भर पडत आहे. यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली. यात पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी आलेल्या अहवालात मागील 24 तसात 2 हजार 297 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यात 12 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात पूर्व विदर्भात 2874 जण नवीन कोरोना बाधित मिळून आले.
नागपुरात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी 2 हजार 300 रुग्णांची भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट सुरू - पालकमंत्री
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले. तीन आठवडे मिनी लॉकडाऊन करून फारसा फायदा होत नसल्याने कठोर निर्बंध लादत शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून विनाकारण फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम राबवली जात आहे. यात पहिल्या दिवशी नागपूरकरांनी दिलेला प्रतिसाद सात दिवस असाच द्यावा असे आवाहन पालकमंत्री राऊत यांनी दिले
तसेच संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचे पालन केले जात असल्याचेही पालकमंत्री राऊत यांनी सांगितले.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 17 हजारच्या घरात..
नागपूर जिल्ह्यात 8 हजार 666 जणांचे कोरोना चाचणी अहवालात 2,297 बाधित मिळून आले. यात 1,933 जण नागपूर शहरात मिळून आले. तेच 361 हे ग्रामीण भागात तर 3 बाहेर जिल्ह्यातून आलेले बाधित असल्याचे पुढे आले. यात कोरोना आजाराने बाधित ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 17 हजार 506 वर पोहचली आहे. तेच आतापर्यंत 1 लाख 72 हजार 799 जण कोरोना बाधित झाले आहे. दैनंदिन मिळणारी 26.5 पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची टक्केवारी आहे.
पूर्व विदर्भात 3 हजारच्या घरात पॉझिटिव्ह तर 13 जणांचा मृत्यू..
पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्यात दररोज दोन हजार पार रुग्ण कोरोना बाधितांची भर पडत आहे. वर्ध्यात रोज दोनशे पार रुग्ण पॉझिटिव्ह मिळून येत आहे. सोमवारी सहा जिल्ह्यात 2872 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यात नागपूरमध्ये 2297, वर्ध्यात 366, भंडारा 82, चंद्रपूर 65, गोंदिया 48, गडचिरोली 16, रुग्ण कोरोना बाधित मिळून आले आहे. यात 1189 रुग्ण तर सोमवारी 1914 रुग्ण कोरोनातू मुक्त झाले आहे. यात नागपूरात 12 जण 1 जण गोंदिया असे 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा :निश्चित दरापेक्षा अधिक किंमतीने मास्क विकल्यास होणार कारवाई