महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS leader Sandeep Deshpande - बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राज ठाकरेच - संदीप देशपांडे - MNS leader Sandeep Deshpande

दसरा मेळावा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray, Emperor of Hindu Heart ) यांचे विचार जनतेपुढे पोहचवण्याचे माध्यम आहे. मुळात राज ठाकरे हेचं बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोण घेऊन पुढे कोण चालले आहे हे महत्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS leader Sandeep Deshpande ) यांनी दिली आहे.

संदीप देशपांडे
संदीप देशपांडे

By

Published : Sep 15, 2022, 10:36 AM IST

Updated : Sep 15, 2022, 2:57 PM IST

नागपूर -शिंदे गटाच्या ( Eknath Shinde group ) दसरा मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे यांना निमंत्रण मिळाले ( Invitation to Raj Thackeray for Dussehra gathering ) आहे की नाही याबद्दल कल्पना नाही. दसरा मेळावा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray, Emperor of Hindu Heart ) यांचे विचार जनतेपुढे पोहचवण्याचे माध्यम आहे. मुळात राज ठाकरे हेचं बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोण घेऊन पुढे कोण चालले आहे हे महत्वाचे आहे. अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS leader Sandeep Deshpande ) यांनी दिली आहे. या या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर -१८ सप्टेंबरपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray ) दौऱ्यावर येत ( Raj Thackeray On Vidarbha Visit ) आहेत. या दौऱ्यात ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीसाठी काय आवश्यक आहे, पक्षातील बदल काय आवश्यक आहे हे राज ठाकरे जाणून घेतील अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे,ते राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी नागपूरात दाखल झाले आहेत.

संदीप देशपांडे

विदर्भातील महानगरपालिकेवर मनसेचे लक्ष -मनसे विदर्भातील नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकांसह इतर निवडणूका डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती या तिन्ही मनपाच्या सर्व जागा लढण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी आम्हाला दिले आहे. आम्ही तशी तयारी करतं असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

नागपूरातील भोंग्यांसंदर्भात निर्णय घेऊ -नवी मुंबई आणि परिसरात अनधिकृत मदरसे होते, त्यासंदर्भात राज साहेब त्याबद्दल निर्णय घेतील अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. मुंबईत भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. आता सकाळी आवाज येत नाही. नागपूर बद्दल आम्ही इथल्या पदाधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेऊ.

राजकारण सोडा,मार्ग काढा -उद्योग महाराष्ट्रातून गेले याबद्दल राजकारण सोडून बोलले पाहिजे.यात आताच्या सरकारची चूक आहे की आधीच्या सरकारची चूक आहे. यावर बोलण्यापेक्षा उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही याबद्दल चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक आहे.

Last Updated : Sep 15, 2022, 2:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details