नागपूर - आपल्या देशाच्या विकासात 29 टक्के वाटा हा लघू आणि छोट्या उद्योगांचा आहे. देशातील 48 टक्के एक्स्पोर्टसुद्धा छोट्या उद्योगांमधूनच होतो. त्यामुळे उद्योग करताना गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकिजिंगवर जोर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उद्योजकांना दिला. नागपुरात आयोजित सहकार भारती संघाच्या महिला विंगतर्फे देशभरातील 1 हजार 200 महिलांचा मेळावा भरवण्यात आला होता. त्यावेळी गडकरी बोलत होते.
'गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकेजिंगवर जोर द्या' - मंत्री नितीन गडकरी नागपूर
आपल्या देशाच्या विकासात 29 टक्के वाटा हा लघू आणि छोट्या उद्योगांचा आहे. देशातील 48 टक्के एक्स्पोर्टसुद्धा छोट्या उद्योगांमधूनच होतो. त्यामुळे उद्योग करताना गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षण पॅकिजिंगवर जोर दिला पाहिजे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उद्योजकांना दिला.
दरम्यान, उद्योग क्षेत्राने 11 कोटी रोजगार दिले आहेत. त्यामुळे 48 टक्के एक्स्पोर्टचा आकडा हा 60 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. तसेच 11 कोटी रोजगार निर्माण झाले असून, तिथे आणखी 5 कोटी रोजगारांची निर्मिती करण्याचे निश्चित झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण उद्योग आहेत. त्याला वाढवता आले पाहिजे. पण, तुम्ही चांगल्या क्वालिटीवर लक्ष केंद्रीत करा, चांगली क्वालिटी दिली नाही तर व्यवसाय संपतो. त्याचबरोबर गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि आकर्षक पॅकेजिंग यावर भर दिला तर तुमचे प्रॉडक्ट्स हातो-हात विकले जातील. यासाठी मदर डेअरीने तयार केलेल्या संत्रा बर्फीचे उदाहरण नितीन गडकरींनी उद्योजकांना दिले.