महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mini Bird Sanctuary : घराच्या गच्चीवरच बनवले 'मिनी पक्षी अभयारण्य'.. दररोज ५०० पक्षी घेतात पाहुणचार - unique activity by bird lovers in Nagpur

नागपूरमध्ये एका पक्षी प्रेमीने अनोखा उपक्रम राबविला ( Unique Activity By Bird Lover ) आहे. त्याने घराच्या गच्चीवरच पक्षांसाठी खास असे 'मिनी पक्षी अभयारण्य' बनवले ( Mini Bird Sanctuary In Nagpur ) असून, याठिकाणी दररोज ५०० हुन अधिक पक्षी पाहुणचार घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना याचा मोठा आधार होत आहे.

Mini Bird Sanctuary
मिनी पक्षी अभयारण्य

By

Published : Apr 24, 2022, 8:08 PM IST

नागपूर- नागपूरच्या गोदणी परिसरात राहत असलेल्या एका पक्षी प्रेमीने ( Unique Activity By Bird Lover ) घराच्या गच्चीवरच छोट्याशा बागेला मिनी 'बर्ड अभयारण्य' बनवले ( Mini Bird Sanctuary In Nagpur ) आहे. जिथे दररोज सुमारे ५०० पक्षी रोज पाहूणचारासाठी येत पाहुणचार घेत उडून जातात. धोकादायक यादीत असलेला शिक्रा पक्षीही अधूनमधून आपली विशेष हजेरी नोंदवतो. जयंत तांदुळकर यांच्या सुमारे दीड दशकातील परिश्रमात त्यांनी हे पाहुणे मिळवले आहेत. यात उन्हाळ्यात या पक्ष्यांसाठी खास सोय करण्यात आली असून, ती जाणून घेऊ या खास रिपोर्टमधून..

अशी केली पक्षांची सोय : जयंत तांदुळकर यांच्या घरी ४० हून अधिक प्रजातींचे पक्षी नियमितपणे गच्चीवरील छोट्याश्या अभयारण्याला भेट देत असतात. पक्षीप्रेमी जयंत तांदुळकर हे शासकीय नोकरीत आहेत. मागील १५ ते १६ वर्षांपासून त्यांनी या उपक्रमाला सुरवात केली आहे. एक दिवशी गच्चीवर एक पक्षी असाच तहानलेला अवस्थेत दिसून आला. त्यादिवसापासून सुरू केलेल्या या कामाला दीड दशक कसे लोटले हे जयंत यांनाही कळले नाही. पण आजही आपला छंद जोपासत पक्षीप्रेमी म्हणून काम करत असतात. या सिमेंटच्या जंगलात पक्षाचा अधिवास किती महत्वाचा आहे, हे पटवून ते सांगतात. त्यासाठी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आकाशात उडणाऱ्या पाहुण्यांसाठी खास सरभराई करतात.

मिनी पक्षी अभयारण्य

टाकाऊ पासून टिकाऊ : या पक्ष्यांना घरावरील गार्डनमध्ये बसता यावे यासाठी खास ग्रीन जाळी बसवून सावली केली. त्यामध्ये छोटंस गार्डन तयार केले. तसेच घराचा आजूबाजूला झाडेही लावले. याठिकाणी त्यांना मुक्तपणे येऊन बसता यावे यासाठी त्यांना खास घरटे बनवून दिलेत. फुटलेले छोटे माठ, मातीचे भांडे, बांबू, लाकडी तुकडे बांधून त्यांना बसण्याची सोय करून दिली. तसेच धान्य खाता येईल यासाठी धान्य ठेवण्यासाठी प्लेट, किंवा इतर वस्तूंचे थांबे बनवून सोय केली आहे.

मिनी पक्षी अभयारण्य

घराच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी केले असे नियोजन : जयंत तांदुळकर यांनी १२०० चौरस फुट गच्चीवर गार्डन केले. रोज सकाळी नियमितपणे सहा वाजता उठून पाहुण्यांची काळजी घेतात. पक्ष्यांसाठी बांबू आणि नारळापासून वाट्या बनवल्या आहेत. त्यामध्ये बाजरी, तांदुळाची कनी ठेवतात. सुरवातीला मोजकेच पक्षी असल्याने त्यांना एक महिन्याला एक किलो तांदूळ लागत होते. पण आता थवेच्या थवे येत असल्याने सुमारे महिन्याला 30 किलोच्या घरात धान्य लागत असल्याचे ते सांगतात. यावरुन पक्ष्यांच्या संख्येचाही अंदाज लावू शकतो.

मिनी पक्षी अभयारण्य

४० पक्षांच्या प्रजाती येतात पाहुणचारासाठी : या ठिकाणी सुमारे ४० -४५ भारतीय सिल्व्हरबिल्स (व्हाइट-थ्रोटेड मुनिया) यांचा कळप येतो. चिमण्या, मॅग्पी रॉबिन, ग्रीन बी-इटर, कॉपरस्मिथ बार्बेट आणि रेड-व्हेंटेड, बुलबुल कोकिळा, ब्राम्हनी मैना, साळुंकी, कोतवाल, सातभाई, राखीवटवटया, शिंपी, सूर्य पक्षी, दयाळ, शिक्रा, पिंगळा, पोपट, भारद्वाज, कोतवाल, खंड्या आदी अनेक पक्षी प्रामुख्याने येत असल्याचे जयंत तांदुळकर यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले.

मिनी पक्षी अभयारण्य

हेही वाचा : Birds Panapoi Gondia : तहानलेल्या पक्षांसाठी सायकल संडे ग्रुपचा पुढाकार; शहरातील विविध भागात 3000 हजार 'पाणवठे'

ABOUT THE AUTHOR

...view details