नागपूर - पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भूषण सतईचे पार्थिव आज रात्री नागपूरला आणले जाणार आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार उद्या ऐवजी सोमवारी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून गुरेज सेक्टरमध्ये सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने पार्थिव शरीर तिथून हलवणे शक्य झाले नव्हते, मात्र आता पार्थिव श्रीनगर येथे आणण्यात आले आहे.
काटोलच्या हुतात्मा जवानावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार आज श्रीनगर येथे सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथसिंह शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर महाराष्ट्रातील दोन जवानांचे पार्थिव नागपूर आणि कोल्हापूरकडे रवाना केले जाणार आहेत. आज भूषणचे पार्थिव नागपूरला आणल्यानंतर ते कामठी येथील मिल्ट्री परिसरात ठेवले जाणार आहे. त्या ठिकाणी सलामी दिल्यानंतर उद्या (सोमवारी) सकाळी भूषणचे पार्थिव त्याच्या मूळ गावी काटोल येथे घेऊन जाण्यात येईल आणि त्याच ठिकाणी उद्या अंत्यसंस्कार पार पाडले जाणार आहेत.
ऐन दिवाळीत नागपूरवर शोककळा -
ऐन दिवाळीच्या पूर्व संध्येला नागपूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरेज सेक्टर श्रीनगर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारा भूषण सतई हा जवान शहीद झाला आहे. ही दुःखद बातमी समजताच संपूर्ण काटोलसह नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना भूषणला वीरमरण आले आहे. तो केवळ २८ वर्षाचा आहे. भूषण सवई अगदी वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाला होता. महाविद्यालयात असल्यापासूनच भूषणने सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. आज दुपारी गुरेज सेक्टर येथे भूषण कार्यरत असताना पाकिस्तानी लष्कराने केरेन सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रतिउत्तर दिले. ज्यामध्ये भूषणला वीरमरण प्राप्त झाले आहे. उद्या भूषणवर काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
प्रशासनाकडून तयारीला सुरुवात -
आज रात्री शहीद भूषण यांचे पार्थिव शरीर वायुसेनेच्या विशेष विमानाने नागपूरला आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मानवंदना दिल्यानंतर ते पार्थिव काटोलकरिता रवाना होईल, अशी माहिती पुढे आली आहे. उद्या सकाळी काटोल येथील मैदानावर भूषणवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, त्याकरिता प्रशासन कामाला लागले असून मैदान स्वच्छ केले जात आहे.