महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रेमाची अधुरी कहाणी.. प्रेयसीची आत्महत्या सहन न झाल्याने प्रियकरानेही संपवले जीवन - love

सम्यक नावाच्या तरुणाचे नागपूरच्या धंतोली परिसरात राहणाऱ्या तरुणीशी मैत्रीपूर्ण प्रेमाचे संबंध होते. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच २५ मार्च रोजी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

नागपुरात प्रियकराची आत्महत्या

By

Published : May 13, 2019, 7:25 PM IST

नागपूर - प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर प्रेयसीच्या अचानक आत्महत्या केल्याने खचलेल्या प्रियकरानेसुद्धा गळफास घेऊन आपले जीवनयात्रा संपवले. ही घटना नागपूर येथील भिलगाव येथे घडली आहे. याबाबत नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

प्रेयसीची आत्महत्या सहन न झाल्याने प्रियकरानेही संपवले जीवन

या प्रकरणातील तरुणीने आत्महत्या का केली हे जाणून घेण्यासाठी दीड महिने आधी घडलेल्या घडामोडी जाणून घेणे गरजेचे आहे. सम्यक नावाच्या तरुणाचे नागपूरच्या धंतोली परिसरात राहणाऱ्या तरुणीशी मैत्रीपूर्ण प्रेमाचे संबंध होते. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच २५ मार्च रोजी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्या तरुणीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते मात्र घटनेच्या आठ दिवसानंतर त्या तरुणीची प्राणज्योत मालवली होती.

मुलीच्या आत्महत्येस सम्यक जबाबदार असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे सम्यक हा खचून गेला होता. जिच्यावर प्रेम केले तिलाच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाल्याचे त्याला सहन झाले नाही. या घटनेचा दीड महिना लोटला असला तरी त्याच्या मनातून ती मुलगी जात नसल्याने दोन दिवसांपूर्वी प्रियकराने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रियकराने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले की. त्या मुली शिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही त्यामुळेच आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्याने लिहून ठेवले. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details