नागपूर - महानगर पालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अविनाश ठाकरे समितीचा प्रथमदर्शनी अहवाल आज महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला.या अहवालात ५ ते ६ कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली असून, सखोल चौकशी अंती घोटाळ्यातील रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा -Duplicate Pista Seized : तुम्ही स्वस्तातला पिस्ता खाताय? सावधान!
नागपूर महानगर पालिकेतील स्टेशनरी घोटाळा सध्या गाजत आहे. महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा समोर आल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी महापालिकेच्या सभागृहात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ७ सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, निवृत्त न्यायाधीश शेखर मुळे, उपायुक्त निर्भय जैन, नगरसेवक संदीप जाधव, संजय बालपांडे, वैशाली नारनवरे यांचा समावेश आहे. समिती स्थापन करण्यात आल्यानंतर एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. गेल्या महिनाभर या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज प्रथमदर्शनी अहवाल आज महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बंद लिफाफ्यात अहवाल सादर -