महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Independence Day एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकरांच्या पराक्रमामुळेचं भारताचा चीनवर वचक - India victory over China

एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर Air Vice Marshal Suryakant Chafekar यांचा जन्म २७ सप्टेंबर १९५९ ला नागपूरला झाला. १९८२ साली ते भारतीय वायुसेनेत Indian Air Force कार्यरत झाले. त्यांना ७ हजार तासांपेक्षा अधिक वेळ उड्डाण केल्याचा अनुभव आहे.

Suryakant Chafekar
सूर्यकांत चाफेकर

By

Published : Aug 15, 2022, 7:32 PM IST

Updated : Aug 15, 2022, 8:05 PM IST

नागपूरहे वर्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष Jubilee Year of Independence म्हणून साजरे केले जातं आहे. इंग्रजां विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक शूरवीरांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा Stories of bravery जागवल्या जात आहेत. स्वातंत्र्य लढ्यात freedom fight अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर अनेकांनी अहिंसेच्या मार्गाने ही लढाई लढली होती, तेव्हा कुठे १५ ऑगस्ट १९४७ला आपला देश गुलामगिरीच्या बंधनातुन मुक्त झाला Freed from slavery होता. त्या ऐतिहासिक घटेनला आज ७५ वर्ष लोटली आहे. मात्र,या ७५ वर्षात आपले स्वातंत्र्य अबाधितपणे टिकून राहावे या साठी भारतीय सैन्य दलातील तीनही अंगात कार्यरत प्रत्येक जवनाने स्वतःच्या आयुष्याचा एक मोठा वाटा खर्च केला आहे. आज आपण वायुदलातील एका शूरवीर योद्धाने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा समजून घेणार असून त्यांचे नाव सूर्यकांत चाफेकर Suryakant Chafekar आहे. ते एअर व्हाईस मार्शल म्हणून २०१७ साली निवृत्त झाले आहेत.

एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर

शौर्य चक्र पदकाने सन्मानित एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर Air Vice Marshal Suryakant Chafekar यांचा जन्म २७ सप्टेंबर १९५९ ला नागपूरला झाला. १९८२ साली ते भारतीय वायुसेनेत Indian Air Force कार्यरत झाले. त्यांना ७ हजार तासांपेक्षा अधिक वेळ उड्डाण केल्याचा अनुभव आहे. १९८२ ला फ्लाईट अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर १९८४ ला ते फ्लाईंग ऑफिसर झाले. त्यानंतर १९८६ ला त्यांना बढती मिळाली आणि त्यांनी फ्लाईंग लेफ्टनंट म्हणून कर्तव्य स्वीकारले. १९९३ ला ते ग्रुप प्रमुख झाले, त्यानंतर १९९९ ला ते विंग कमांडर झाले. २००६ ला ग्रुप कमांडर, २०१० ला एअर कमोडोर आणि २०१५ एअर व्हाईस मार्शल म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. देशसेवेसाठी त्यांना भारत सरकारने २०१५ साली अति विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित केले आहे तर दौलत बेग ओल्डी येथे विमान उतरवण्याचे धाडस दाखवल्याने त्यांना २००९ साली शौर्य चक्र पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर

२००८ साली केलेली कामगिरी आजही प्रेरणादायी गेल्या काही वर्षांमध्ये चीनची भारताच्या हद्दीत घुसखोरी वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे दोन्ही देशामधील संबंध आता तणावपूर्ण आहेत. चीनच्या कुरापतींवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने जगातील सर्वोच्च ठिकाण असलेल्या दौलत बेग ओल्डी येथे विमान उतरवण्याचे धाडस २००८ साली दाखवले होते. भारतीय सैन्याला हवी तेव्हा रसद पुरवता यावी म्हणून नागपूरकर असलेले एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी त्यावेळी दाखवलेले कर्तृत्व आज सैन्यासाठी फार उपयोगाचे ठरत आहे. २००८ साली भारतीय वायूसेनेने घेतलेल्या एका अतिशय महत्वपूर्ण धाडसाचा फायदा भारतीय लष्कराला होत आहे. समुद्र सपाटी पासून तब्बल १६ हजार ७०० फूट उंचीवर हवाई धावपट्टी तयार करून तिथे वायुसेनेचे विमान उतरवण्याचे कौशल वायू सेनेचे तत्कालीन ग्रुप कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी करून दाखवले होते.

सूर्यकांत चाफेकर

जगातील सर्वात उंच ठिकाणी उतरवले विमान चीनच्या जवळ असलेल्या लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील दौलत बेग ओल्डी Daulat Beg Oldy येथे जगातील सर्वात उंच धावपट्टी तयार करून तिथे विमान उतरवण्यात आले. ही धावपट्टी चहुबाजूने उंच पर्वतांनी वेढलेली आहे, शिवाय येथे प्राणवायूचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी असल्याने विमान उतरवणे सोपे नसते. तिथे जाण्यासाठी रस्तादेखील नसल्याने केवळ पायी जाण्यासाठी २२ दिवस लागतात.

चाफेकरांचे अतुलनीय साहसनैसर्गिक अडचणी आणि चीनशी वाद नको म्हणून १९६२ ला चीनशी झालेल्या युद्धानंतर दौलत बाग ओल्डी Daulat Beg Oldy येथे हवाई हालचाली करण्यास भारताने पुढाकार घेतला नाही. मात्र, भविष्यातील गरज ओळखून ग्रुप कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथे धावपट्टी तयार करून ट्रायल घेण्याची विनंती केली व ३१ मे २००८ मध्ये ४३ वर्षांनी एएन-३२ विमान उतरवले. सूर्यकांत चाफेकर यांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. चाफेकर यांनी १०० हून अधिक वेळा तिथे विमान उतरवले आणि ही धावपट्टी वायुसेनेसाठी नियमित सरावासाठी उपलब्ध करून दिली.

हेही वाचाIndependence Day सातार्‍यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण

Last Updated : Aug 15, 2022, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details