नागपूर -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकलेला आहे. 11 वाजेच्या सुमरास आयकर विभागाचे 25पेक्षा जास्त अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यापैकी काही अधिकारी हे काटोल येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी देखील गेल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन तासांपासून अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. मात्र, अद्याप त्यांनी यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही.
यापूर्वीही अनिल देशमुखांच्या घरी ईडीचा छापा -
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अंटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणात मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंग यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपये महिन्याला वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचे लिहिले होते. या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तेंव्हापासून अनिल देशमुख हे ईडीच्या रडावर आहे. दरम्यान, यापूर्वीही ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापा टाकला होता.
हेही वाचा- राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना कोणताही त्रास नाही - मंत्री छगन भुजबळ