नागपूर - सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क स्टेशन आणि फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून या मध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. १.६ किलोमीटर लांब या मार्गाच्या उदघाटना अंतर्गत झिरो माईल स्टेशन आणि कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्क चे देखील उदघाटन करण्यात आले.
नागपुरात महामेट्रोच्या फ्रिडम पार्कचे उदघाटन; मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे केले कौतुक - india 75 independence day
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्क निर्माण झाले आहे. या स्थानकाचे नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्क निर्माण झाले आहे. या स्थानकाचे नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवले आहे. अतिशय अनोख्या पद्धतीने साकार केलेला हा पार्क म्हणजे नागरी भागातील लँडस्केपिंगचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवल्या आहेत. युद्धात वापरलेला T -५५ रणगाडा देखील ठेवला आहे. फ्रिडम पार्कच्या आत डाव्या बाजूला अँफी थिएटर आहे. येथील हिस्ट्री वॉल शाहिद स्मारकापर्यंत आहे.
नितीन गडकरींची छाप - एकनाथ शिंदे
झिरो माईल देशाचा केंद्र बिंदू आहे. महामेट्रोने त्याचा चांगला विकास केला आहे. बाळासाहेबांचं मुंबई पुणे एक्सप्रेस-वेचे स्वप्न गडकरी साहेबांनी पूर्ण केलं. त्याच प्रमाणे त्यांनी नागपूरला देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या कामाचे कौतुक स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केले आहे. गडकरी यांच्या कामाची छाप राज्याच्या विकासात स्पष्टपणे दिसून येत आहे.
महामेट्रोने इतिहासा घडवला आहे - नितीन गडकरी
महामेट्रोने नागपूरचा गौरवशाली इतिहासाला लक्षात घेऊन काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा. त्यांनी मेट्रोसाठी आवश्यक सर्व परवानग्या लगेच मिळाल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील नागपूरच्या विकासाचे काम पुढे नेले आहे. नागपूरचा विकास पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचही ते म्हणाले. झिरो माईल स्टेशन नागपूर मेट्रो प्रकल्पाची अतिशय महत्वाची आणि तितकीच अनोखी वास्तू आहे. हे मेट्रो स्टेशन २० मजली इमारतीचा भाग असेल. चौथ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेन येईल. नवीन तंत्रज्ञानामुळे फ्रिडम पार्क स्टेशन हे देशातील एकमेव मेट्रो स्थानक असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
गडकरी आणि आमचे नाते थोडं वेगळं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमचं नाते थोडं वेगळं आहे. कारण ते आणि आम्ही कार्यतत्पर आहे. जनतेच्या कामासाठी आम्ही नेहमीच तात्पुर असतो. इतिहासाने ज्या कामाची नोंद घेतली त्याची जतन करणे आपलं काम आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विकासासाठी एकत्र येतो तेव्हा राजकीय जोडे काढून येतो असं म्हणत त्यांनी चिमटे देखील काढले आहेत. प्रत्येकाला आपल्या शहराबद्दल तळमळ असते आणि तीच तळमळ नितीन गडकरी यांच्या कामातून दिसते. असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणादरम्यान गडकरी यांच्या कामाची प्रशंसा केली. नितीन गडकरींनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या भाषणात केला.
सीताबर्डी-कस्तुरचंद पार्क मार्गिका
या मार्गिकेवरील मेट्रो प्रवास सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडले जातील. रोज सुमारे ५०,००० प्रवाशांना या माध्यमाने प्रवास करता येईल. हा मार्ग शहरातील अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो, जसे विधान भवन (महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वात वर्दळीची वास्तू), भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरीस कॉलेज इत्यादी स्थळ यामुळे जोडली जातील.
झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन
नागपुरात स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन निर्माण करण्याची प्रेरणा शहरातील हेरीटेज स्मारक असलेल्या झिरो माईल स्मारकामुळे मिळाली आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १९०७ मध्ये संपूर्ण देशात ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षानंतर झिरो माईल स्मारकाचे निर्माण झाले आहे. हे स्मारक मेट्रो स्थानकाच्या जवळ आहे.
हेही वाचा -देशाला मिळाली दुसरी स्वदेशी कोरोना लस; झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन मंजुरी