नागपूर - गेल्या २४-तासात राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात ३७२० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज सुद्धा नागपुरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. २४ तासात नागपूर मध्ये तब्बल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर या तीन दिवसांमध्ये १४७ रुग्णांनी आपला जीव गमावलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक देखील घेतली असून यामध्ये मृत्यूची संख्या कमी करण्यावर चर्चा झाली आहे.
३६६० कोरोना बधितांची कोरोनावर मात-
काल (शुक्रवार) नागपूर शहरात आणि जिल्हात ४१०८ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज (शनिवार) हा आकडा काहीसा कमी झालेला आहे. शनिवारी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३७२० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज ३६६० कोरोना बधितांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे, ज्यामुळे सध्या नागपुरात ४० हजार ८२० इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.