नागपूर - गणेश जयंती निमित्त नागपूरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तांची अलोट गर्दी दर्शनासाठी उसळली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधांमुळे गणेश जयंतीला टेकडी गणेश मंदिर भाविकांसाठी बंद होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा भक्तांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
अनेक भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त ( occasion of Ganesh Jayanti ) दिवसाची सुरुवात बाप्पाचा आशीर्वाद घेऊन केली आहे. दोन वर्षात जे दुःख आपल्या देशातील नागरिकांनी सोसले आहे, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती नागरिकांना दे. सर्वांना निरोगी आयुष्य प्रदान कर, असे मागणे नागपूरकरांनी श्री टेकडी गणेशाकडे ( Shree Tekadi Ganesh ) प्रार्थना केली आहे.
नवसाला पावणाऱ्या टेकडी गणेश मंदिरात भक्तांची मांदियाळी हेही वाचा-Santosh Parab Attack Case : संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
भक्तांमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही समावेश
नागपूरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी आपल्याला वर्षभर बघायला मिळते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणूनदेखील टेकडी गणेश प्रसिद्ध आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मंदिराचे द्वार भक्तांसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र, सर्व निर्बंध दूर झाल्याने भक्त आनंदी झाले आहेत. नागपूरच्या या टेकडी गणेशाच्या भक्तांमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह कला क्षेत्रातील देखील अनेक मंडळींचा समावेश होतो.
हेही वाचा-Rahul Gandhi In Goa : राहुल गांधींचा गोव्यात घरोघरी प्रचार, सभांना करणार संबोधित
टेकडी गणपती मंदिराचा इतिहास-
इंग्रजांची सत्ता असताना राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती. त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचे पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात हे विनायकाचं हे मंदिर लहान होते. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. मात्र बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे. तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीमागे भिंती जवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोके आणि सोंड आहे. सध्या, शेंदुराच्या लेपामुळे ही मूर्ती स्पष्टपणे दिसत नाही.
हेही वाचा-Bandatatya Karadkar Apology: राष्ट्रवादी नेत्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल बंडातात्या कराडकरांचा माफीनामा