नागपूर- गेल्या अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी आनंदाची बातमी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरुंगातील जवळजवळ ११ हजार आरोपी गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
११ हजार आरोपींची सुटका पॅरोलवर करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश
७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळजवळ ११ हजार आरोपी गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या आदेशावर पुढील आठवड्याभरात कारवाई व्हावी, अशाही सूचना दिल्या आहेत.