महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Heat Wave in Vidarbha : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णतेची लाट, एप्रिलमध्ये पुन्हा तापणार! - उष्णतेची लाट

विदर्भात सूर्य तळपायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा मार्च महिन्यातच पारा ४० अंशाच्या पुढे गेलामुळे एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा आणखीन वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

उष्णतेची लाट
उष्णतेची लाट

By

Published : Mar 29, 2022, 12:44 PM IST

Updated : Mar 29, 2022, 1:03 PM IST

नागपूर- एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. नागपूरसह विदर्भात अक्षरशः सूर्य तळपायला सुरुवात झाल्याने मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णतेची लाट

राजस्थानकडून उष्ण वारे - विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. राजस्थान कडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याची माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ नागपूर आणि विदर्भातचं नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा वर चढलेला दिसून येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान हे चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे. विदर्भात अचानक तापमान वाढण्यामागे राजस्थान कडून येणारे उष्ण वारे कारणीभूत असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.

एप्रिलमध्ये पुन्हा तापणार

तापमान आणखी वाढण्याची शक्यता - विदर्भात सूर्य तळपायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा मार्च महिन्यातच पारा ४० अंशाच्या पुढे गेलामुळे एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा आणखीन वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Last Updated : Mar 29, 2022, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details