नागपूर -धम्मचक्र प्रवर्तन दिनाप्रमाणेच बुद्ध जयंती तसेच बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आपल्या देशात वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या ( Gautama Buddha Vaishakh Pournima ) दिवशी झाला. त्याचबरोबर त्यांना ज्ञानप्राप्ती सुद्धा याच दिवशी झाली होती. एवढेच नाही तर भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिनी झाले होते. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील तीन ऐतिहासिक ( Buddha Pournima Historical significance ) आणि महत्वाच्या घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्याने हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
बुद्ध पौर्णिमेचा दिवस उपासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बौद्ध लोकांची विशिष्ट अशी आचरण पद्धती असते. प्रामुख्याने या दिवशी बौद्ध भिक्षू परित्रण पाठ करतात तर उपासक आणि उपासिका अष्टशील ग्रहण करून संपूर्ण दिवस शिलाआचरण करत असतात. वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्धांनी संबोधी प्राप्त करून दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. हा मार्ग प्रत्येक माणसासाठी कल्याणाचा मार्ग आहे. भगवान बुद्धांची शिकवण ही मनुष्याला, समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा मानव आणि जीव प्राण्यांसाठी सुखकारक कल्याणकारक ठरतो आहे.
दुःख मुक्तीचा तथागतांचा अष्टांगिक मार्ग :प्रत्येक धर्मात आणि तत्त्वज्ञानात अज्ञानाला दुःखाचे मूळ कारण मानले गेले आहे. त्याला नष्ट करण्याचे वेगवेगळे उपाय देखील सांगण्यात आले आहेत. परंतु प्रत्येक धर्म आणि तत्त्वज्ञान हे ईश्वराच्या किंवा देवाच्या माध्यमातून अज्ञानाला नष्ट करण्याचा मार्ग सांगतो. म्हणजे प्रत्येक धर्मात म्हटले आहे की ईश्वराला जाणले आत्मा परमात्मा जाणने. त्यांना साक्षात्कार करणे म्हणजे ज्ञान आहे. एका प्रकारे प्रत्येक धर्मात अज्ञानाची व विज्ञानाची परिभाषा केलेली आहे आणि ही परिभाषा ईश्वरापर्यंत मर्यादित झालेली आहे. परंतु बौद्ध धम्मात भगवान बुद्धाने अज्ञानाची आणि ज्ञानाची वेगवेगळ्या पद्धतीने परिभाषा केलेली असून ही परिभाषा ईश्वराच्या, आत्मा, परमात्मा त्या पलीकडील आहे. इथे ईश्वराला, देवाला तसेच आत्म्याला कुठेच नाही. भगवान बुद्धाने अज्ञानाला सर्व दुःखाचे कारण मानले आहे. अज्ञानामुळे समाजाची कशी हानी होते तेही भगवान बुध्दांनी सांगितले आहे.