महाराष्ट्र

maharashtra

Governor Koshyari controversial statement : मोदींपूर्वी भारतीयांना जगात जो मान.. या विधानामुळे राज्यपाल पुन्हा ठरले टीकेचे धनी

By

Published : Aug 6, 2022, 11:22 AM IST

Updated : Aug 6, 2022, 11:43 AM IST

राज्यापाल भगसिंह कोश्यारी हे सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ( Governor koshyari controversial statement ) विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आहे. आता त्यांनी केलेल्या ( Governor koshyari on indians respect in world ) एका विधानाने त्यांच्यावर पुन्हा टीका ( Governor koshyari nagpur news ) होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी जगात भारतीयांना जो मान मिळाला नव्हता तो आता जगात मिळत असल्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी म्हणाले आहेत. या वक्तव्यावर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे.

governor koshyari on indians respect in world
राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त विधान

नागपूर - राज्यापाल भगसिंह कोश्यारी हे सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ( Governor koshyari controversial statement ) विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आहे. आता त्यांनी केलेल्या एका विधानाने त्यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( Governor koshyari on indians respect in world ) नेतृत्वात आपला देश ( Governor koshyari nagpur news ) वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर दिवसाला वीस-वीस तास सलग काम करतात, त्यामुळे जगात भारताची कीर्ती वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी जगात भारतीयांना जो मान मिळाला नव्हता तो आता जगात मिळत असल्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी म्हणाले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र त्यांच्या या विधानावर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून निषेध होत आहे.

कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी

हेही वाचा -ATM Theft In Nagpur : शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर एटीएम फोडणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनात्मक पदावरील व्यक्तीने असे वक्तव्य करणे निंदनीय - रोहित पवार : पंतप्रधानमोदींपूर्वी जगात देशाचा मान नव्हता काय? त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी काहीच केले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्यपालांचे वक्तव्य खोडून काढले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले, की मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केले नाही, असे नाही. आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसेच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचेच योगदान असते असे नाही. तर, आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरिकांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असे वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणे ही अत्यंत निंदनीय बाब ( Rohit Pawar Slammed Bhagat singh ) आहे, असे ते म्हणाले.

कटुता निर्माण करत असल्याचा आरोप -काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही नागरिकांच्या योगदानाचे कौतुक करताना त्यांच्याकडून एक आक्षेपार्ह विधान झाले होते. त्यासाठी त्यांना माफी देखील मागावी लागली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी चक्क त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज्यपाल राज्यातील नागरिकांमध्ये कटुता निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. राज्यपालांच्या या वक्तव्यावर भाजपलाही विरोधी पक्षांनी धारेवर धरले होते. अशात राज्यपालांच्या नवीन वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. आता राज्यपालांच्या या वक्तव्यावर पुढे कोण काय म्हणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कौतुक - राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागपूर विद्यापीठातील कार्यक्रमाला मोठमोठी व्यक्ती उपस्थित होती. सुप्रसिद्ध वैज्ञानिक होमी बाबा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यपालांनी नितीन गडकरी यांचे कौतुकही केले आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला घडविणारे हे ज्ञानपीठ आहे, असे राज्यपाल म्हणाले. राज्यपालांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख त्यांनी केलेल्या दर्जेदार महामार्गांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात झाली असल्याचे आवर्जून सांगितले.

हेही वाचा -Swine flu positive in Nagpur : नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने गाठली पंच्याहत्तरी, 5 जणांचा घेतला बळी

Last Updated : Aug 6, 2022, 11:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details