नागपूर -राज्यात अस्तित्वात असलेले आणि भविष्यात होणाऱ्या उच्च व शिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना मात्रोश्री नाव देण्याचा निश्चय उदय सामंत यांनी केला आहे. आज नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांसोबत बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक मुलींना आईच्या प्रेमाची ऊब मिळते, त्याचप्रमाणे घराबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला आई या नावाची ऊब मिळावी या उद्देशाने यापुढे उच्च व शिक्षण विभागाकडून तयार होणाऱ्या मुलींच्या वस्तीगृहांना मातोश्री नाव देणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. याशिवाय रखडलेली भरतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, राज्यातील प्राध्यापकांच्या 40 टक्के पद भरणार व प्रचार्यांच्या भरतीलासुद्धा परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तक्रारींचे निवारण करण्यासाठी भरवला जनता दरबार
आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत नागपूरच्या दौऱ्यावर होते,यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाअंतर्गंत येत असलेली महाविद्यालये, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार भरवला होता. यावेळी त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापन समितीने उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबत योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमापूर्वी व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत विविध समस्यांबाबत बैठक पार पडली.