नागपूर- शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी भागात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणीचे नाव हुसना, असे असून ती 21 ते 24 वयोगटातील आहे. हुसनाचा खून झाल्याचा संशयावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
नागपुरात आढळला तरुणीचा मृतदेह - dead body found in nagpur city
मंगळवारी भागात एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रातिनिधीक छायाचित्र
सदर पोलिसांच्या माहिती नुसार हुसना ही तरुणी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती काल (मंगळवारी) घरी परतली नव्हती. आज सकाळी तिचा मृतदेह मंगळवारी (दि. 15 मार्च) बाजार परिसरातील एका इमारतीच्या तळ मजल्यावर आढळून आला. या घटनेची माहिती समजताच सदर पोलीसांनी घटनास्थळ गाठून हुसनाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तरुणीचा गळा आवळून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.
Last Updated : Mar 16, 2020, 5:42 PM IST