महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chal culture created by Ganesha devotee मुंबईतील चाळ संस्कृतीच्या माध्यमातून एकोप्याची भावना, गणेशभक्ताने साकारला चाळ संस्कृतीचा देखावा - चाळ संस्कृती देखावा

नागपुरातील एका गणेशभक्ताने चाळ संस्कृतीचा देखावा साकारला आहे. १५ दिवस अहोरात्र मेहनत करून श्रीकांत गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही चाळ संस्कृतीचा देखावा साकारला Chal culture created by Ganesha devotee. नवीन तरुण पिढीला जुन्या काळातील आपली चाळ संस्कृतीची माहिती कळावी, या संकल्पनेतुन त्यांनी हा देखावा साकारला आहे. Ganesha devotee created A scene of Chal culture of Mumbai

Chal culture created by Ganesha devotee
गणेशभक्ताने साकारला चाळ संस्कृतीचा देखावा

By

Published : Sep 6, 2022, 3:36 PM IST

Updated : Sep 6, 2022, 7:36 PM IST

नागपूर -चाळ संस्कृती ही मुंबईसाठी Chal culture created by Ganesha devotee नवीन नसली, तरी नागपूरसाठी उत्सुकतेचा विषय आहे. हजारो कुटुंबांना भावनिक नात्याच्या बंधनात एकत्र बांधून ठेवणारी चाळ संस्कृती आता लुप्त पावत आहे. चाळ संस्कृती कशी असते, त्यात काय विशेषतः असतं, हा देखावा नागपुरातील एका गणेशभक्तांने घरात तयार केला आहे. श्रीकांत गडकरी असे या गणेशभक्तांचे नाव आहे. तब्बल १५ दिवस अहोरात्र मेहनत करून श्रीकांत गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही चाळ संस्कृतीचा देखावा साकारला Ganesha devotee created Chal culture आहे. नवीन तरुण पिढीला जुन्या काळातील आपली चाळ संस्कृतीची माहिती कळावी, या संकल्पनेतुन त्यांनी हा देखावा साकारला आहे. ganeshotsav 2022

मुंबईतील चाळ संस्कृतीच्या माध्यमातून एकोप्याची भावना


नागपूर महानगर पालिकेच्या माध्यमिक शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत गडकरी दरवर्षी गणेशोत्सव काळात एखादा विषय घेऊन कलाकृती साकारत असतात. यावर्षी त्यांनी तीन मजली कृत्रिम चाळ तयार केली केली. संपूर्ण नागपुरात सध्या ही चाळ चर्चेचा विषय ठरली असून, चाळ पाहण्यासाठी नागपूरकरांची चांगलीच गर्दी होत आहे.


चाळीतील घरांना दिले थोर महापुरुषांचे नावेChal culture of Mumbai श्रीकांत गडकरी यांनी चाळीला अखंड भारत निवास असे नाव दिले आहे. श्रीकांत गडकरी यांनी तीन मजली चाळ तयार केली. त्यातील प्रत्येक घरांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या आणि इतिहास संपन्न करणाऱ्या थोर महापुरुषांचे नावे दिले आहेत. चाळीतील घरांना महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, शाहू महाराज, बिरसा मुंडा, रवींद्रनाथ टागोर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, पु. ल. देशपांडे इत्यादी थोर पुरुषांची नावे दिलेली आहे.



विविध विषयांवर कलाकृती साकारतश्रीकांत गडकरी हे गेल्या सात-आठ वर्षांपासून विविध विषयांवर कलाकृती साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी शिळाची बोट, दुर्बीणने पाहताना उंदीर, विशालकाय कासव, समुद्रमंथन हे विविध विषय घेऊन कलाकृती तयार केल्या होत्या. थोर पुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळावी, या दुहेरी उद्देशाने शहरातील कलावंत श्रीकांत गडकरी यांनी चाळ संस्कृतीचा देखावा तयार केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी अखंड भारतनिवास नावाची चाळ साकारली असल्याचं ते सांगतात. Ganesha devotee created A scene of Chal culture of Mumbai

हेही वाचाBappa of Right trunk of Pilankar family पिळणकर कुटुंबाचा उजव्या सोंडेचा बाप्पा, 76 वर्षांची परंपरा

Last Updated : Sep 6, 2022, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details