नागपूर- शहरातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या भागात अजूनही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अशातच आता गड्डीगोदाम हे नवे कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. गेल्या २४ तासात याच गड्डीगोदाम भागातून तब्बल ९ कोरोनाबाधित रुग्ण पुढे आल्याने या परिसराला कन्टेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आला आहे.
नागपुरात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट 'गड्डीगोदाम'; 24 तासात 9 कोरोनाबाधित आढळले
सतरंजीपुरा, मोमीनपुरानंतर गड्डीगोदाम परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागल्याने प्रसासनाची चिंता वाढली आहे
नागपुरात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट 'गड्डीगोदाम'
नागपूर कामठी मार्गावरील गड्डीगोदाम हा परिसर दाटीवाटीने वसलेला आहे. या भागात कोरोनाचा प्रसार वाढीस लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या भागातील सुमारे ४०० नागरिकांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे आतातरी नागरिकांना घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Last Updated : May 19, 2020, 2:53 PM IST