महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक; भंगार कारच्या डिक्कीत आढळला अज्ञात तरुणाचा नग्न मृतदेह, शहरात खळबळ - नागपुरात कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

मोमीनपुऱ्यातील गार्डलाईन परिसरात नौशाद शहा याचे भंगार समान खरेदी विक्रीचे दुकान आहे. नौशादने आठ दिवसांपूर्वी एक भंगार कार विकत घेतली होती. त्यावेळी संपूर्ण कार तपासून घेतली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कारमधून दुर्गंधी येत होती.

Found Youth Dead Body In Car
भंगार कारच्या डिक्कीत आढळला अज्ञात तरुणाचा नग्न मृतदेह

By

Published : Apr 16, 2022, 2:05 PM IST

नागपूर -भंगार कारच्या डिक्कीत तरुणाचा नग्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील मोमीनपूरच्या गार्डलाईन येथे उघडकीस आली. घटनेची माहिती समजताच तहसील पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मोमीनपुऱ्यातील गार्डलाईन परिसरात नौशाद शहा याचे भंगार समान खरेदी विक्रीचे दुकान आहे. भंगार कार विकत घेऊन त्यातील स्पेअरपार्ट काढणे आणि त्याची विक्री करण्याचे काम नौशाद शहा करतो. नौशादने सुमारे आठ दिवसांपूर्वी एक भंगार कार विकत घेतली होती. त्यावेळी संपूर्ण कार तपासून घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून कारमधून दुर्गंधी येत होती. मात्र एखाद्या कुत्रा किव्हा मांजर मेली असावी, असा समज झाल्याने नौशाद यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र काल नौशाद शहा यांच्या गॅरेंजमध्ये काम करणारे कर्मचारी कारमधील पार्ट काढण्यासाठी गेले असता डिक्कीत मृतदेह आढळून आला आला. त्यानंतर तात्काळ घटनेची माहिती तहसील पोलिसांना देण्यात आली.

तरुणाची हत्या करून लपवला मृतदेह -अज्ञात तरुणाची हत्या केल्यानंतर तो मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने डिक्कित ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच आरोपींचा शोध घेणे शक्य होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details