नागपूर -राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोर केली आहे. त्यामुळे शिवसेच्या अस्तित्वाचाचे प्रश्न निर्माण झाला आहे असे अनेकांना वाटते असेल मात्र ज्यांनी बाळासाहेबांसोबत शिवसेनेचे काम केले आहे. त्यांना मात्र तसे मुळीचं वाटतं नाही. शिवसेनेने या आधी सुद्धा तीन मोठे बंड सहजतेने पचवले आहेत, त्यामुळे शिंदे यांनी केलेले बंद फार काही दिवस चालणार नाही असे परखड मत शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख आणि ज्येष्ठ कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले आहे. 80 च्या दशकात होती ती शिवसेना आता राहिली नाही. आताची शिवसेना शांत, परिपक्व, सर्वसमावेशक विचारांची आहे, त्यामुळेच बंडखोरांना त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता आता शिवसेनेत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. ( Dnyanesh Wakudkar on shiv sena hindutva )
शिवसेनेचा पिंड हिंदुत्ववादी नाहीचं -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाचे काम सुरू आहे. मात्र, कायम ज्यांच्या विरोधात लढलो त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता उपभोगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्ववाचा विसर पडला आहे,असा आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. मात्र,ज्यांनी शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कामं केलं आहे, त्याचं या संदर्भात मत वेगळे आहे. मुळात शिवसेनेचा पिंड हिंदुत्ववादी नव्हताचं असा दावा ज्येष्ठ कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी केला आहे. मराठीच्या मुद्यावर शिवसेनेचा जन्म झाला, त्यानंतर मराठी - अमराठीचा मुद्दा हाती घेण्यात आला. मात्र कालांतराने शिवसेना हिंदुत्वाकडे वळली होती, असा दावा त्यांनी केला आहे.