महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...जेव्हा प्रणव मुखर्जींनी आरएसएसच्याच व्यासपीठावर जाऊन दिलं होतं राष्ट्रीयत्वाचं बौद्धीक

तमाम काँग्रेसजनांच्या नाराजीची तमा न बाळगता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ७ जून २०१८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्ग समारोपीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी भाषणही दिले. संघाच्या व्यासपीठावर देण्यात आलेले हे भाषण चांगलेच गाजले.

pranab mukharjee with RSS
आठवणींना उजाळा...तमाम काँग्रेस नेत्यांचा विरोध झुगारून प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात

By

Published : Sep 1, 2020, 12:39 PM IST

नागपूर -तमाम काँग्रेसजनांच्या नाराजीची तमा न बाळगता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ७ जून २०१८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्ग समारोपीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी भाषणही दिले. संघाच्या व्यासपीठावर देण्यात आलेले हे भाषण चांगलेच गाजले. कारण यामध्ये त्यांनी विविधतेत एकता, राष्ट्रीयत्व, भारतीयत्व या विषयांवर विचारमंथन केले; आणि संघाला थेट या संज्ञांच्या व्याख्या सांगितल्या. त्यानंतर हे भाषण चांगलेच चर्चेचा विषय ठरले.

आठवणींना उजाळा...तमाम काँग्रेस नेत्यांचा विरोध झुगारून प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात

भाषणाची सुरुवातच देशातील विविधतेने करत त्यांनी संघ परिवारालाच राष्ट्रीयत्नाच्या व्याख्या सांगितल्या. हा देश गांधींचा असून तोच वारसा पुढे नेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. देश सर्व धर्मीयांचा असून या ठिकाणी विविध संस्कृती एकत्र नांदत असल्याचे ते म्हणाले. हाच आपला इतिहास असून याच्या नोंदी भारतात भ्रमंतीसाठी आलेल्या युरोपीयन तसेच चीनी कागदपत्रांमध्ये आढळतात, असे ते म्हणाले. भारतीय राष्ट्रीयत्व हे 'वसुधैव कुटुम्बकम्'चा संदेश देतं. आपण सहिष्णू असून शतकांपासून भारतीय याच तत्वावर कायम असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक विविधतेत आपले ऐक्य असल्याचा उल्लेख मुखर्जी यांनी केला.

डॉ. हेडगेवारांच्या घराला देखील भेट दिली होती.

आज प्रणव मुखर्जी आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या जीवन यात्रेतील अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात येतोय. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रम सहभागी होणे, ही त्या वर्षातील सर्वात मोठी राजकीय घडामोड होती. आरएसएसकडून दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असताना या घटनेचा उल्लेख होणे स्वाभाविक आहे.

नागपुरातील रेशीम बागेत असलेल्या स्मृती मंदिराला मुखर्जींनी भेट दिली.

ज्यावेळी ही बातमी समोर आली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती आणि कट्टर काँग्रेसी प्रणव मुखर्जी सहभागी होणार आहेत, तेव्हा चर्चांना उधाण आलं. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पळाला. सर्व विरोध झुगारून ते ठरल्या दिवशी आणि ठरल्या वेळेत नागपूरला आले. नागपुरातील रेशीम बागेत असलेल्या स्मृती मंदिराला मुखर्जींनी भेट दिली. तसेच डॉ. हेडगेवारांच्या घराला देखील भेट दिली होती.

आठवणींना उजाळा...तमाम काँग्रेस नेत्यांचा विरोध झुगारून प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात

आज प्रणव मुखर्जी आपल्यात नाही म्हणून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रणव मुखर्जी यांचं स्मरण केलं जातं आहे. प्रणव मुखर्जी यांना सर्वसमावेशक राजकारणी असल्याची मान्यता होती. त्यामुळेच कट्टर काँग्रेसी असताना देखील संघाच्या व्यासपीठावर ते आले होते. ही घटना स्वयंसेवकांसह सामान्य नागपूरकरांच्या मनात आजही ताजी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details