नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालया मार्फत मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला जात असून, यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक प्रतिमा, मूर्ती तसेच शिल्प यांचा लिलाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांना विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आई सोबतच्या फोटोला 20 लाखांची किंमत देण्यात आली आहे. तसेच बाबासाहेबांच्या वस्तूंची किंमत त्यापेक्षा कमी ठेवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला देशातून आणि परदेशातून सन्मान स्वरूपात महापुरुषांच्या प्रतिमा तसेच शिल्प भेट स्वरूपात मिळत असतात.
या भेटवस्तू वस्तुसंग्रहालयात ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत असून, www.pmmementos.gov.in या संकेतस्थळवर संबंधित प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. संबंधित लिलावात विकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि फोटो यांचा समावेश आहे. सरकार या वस्तू विकून गंगा सफाई अभियानात हे पैसे खर्च करणार आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेला सन्मान हा वस्तू संग्रहालय ठेवण्याची गरज होती, पण सरकारने ते विकायचा घाट घालून बाबासाहेबांच्या विचारांचा अनादर केल्याचा आरोप डॉ.राऊत यांनी केला आहे.