नागपूर-पाकिस्तानच्या कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली असून याचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल हा बंधनकारक नसतो. त्यामुळे तो निर्णय स्वीकारायचा की नाही हे पाकिस्तानवर अवलंबून आहे. पाकिस्तान सारख्या बंडखोर देशाने हा निर्णय न स्वीकारल्यास भारत संयुक्त राष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे दाद मागू शकतो.
नागपूर: आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय पाकिस्तानला बंधनकारण नाही - अभय पटवर्धन - Jadhav
पाकिस्तान सारख्या बंडखोर देशाने हा निर्णय न स्वीकारल्यास भारत संयुक्त राष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे दाद मागू शकतो. असे मत निवृत्त लष्कर अधिकारी डॉ. अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या यादीत चीन आहे आणि चीन हा पाकिस्तानची नेहमीच पाठराखण करतो. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) निर्णय अमान्य करीत पाकिस्ताने हा खटला त्यांचा त्या देशात चालवायचा निर्णय दिला तर भारताच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची परवानगी द्यायची की नाही हे पाकिस्तानवर अवलंबून आहे. आपल्या वकिलांच्या ठिकाणी भारतीय राजदूताला परवानगी आहे. त्यामुळे अंतिम निर्णय येई पर्यत भारताने शांततेने तयारी करावी, असे मत निवृत्त लष्कर अधिकारी डॉ. अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.