महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात औद्योगिक वसाहतीतील ब्रिक्स कंपनीच्या कारखान्याला आग

अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने ही आग कारखान्याच्या बाजूला असलेल्या गोदामात पसरली नाही. या गोदामात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि तयार माल साठवलेला होता.

नागपूर

By

Published : Apr 7, 2021, 10:42 PM IST

नागपूर- जिल्ह्यातील हिंगणा औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) येथील कटारिया ब्रिक्स कंपनीच्या कारखान्यात आग लागल्याने खळबळ निर्माण झाली. ही आग दुपारी पाच वाजताच्या सुमारास लागली असल्याचे बोलले जाते. अचानक आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघताना दूरवरून दिसत होते. अचानक लागलेल्या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. या कारखान्यात ज्वलनशील ब्रिक्स बनवले जात असून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

कटारिया ब्रिक्स कंपनीत लाकडी भुशापासून ज्वलनशील विटा बनवण्याचे काम सुरू होते. यात बनवलेल्या ज्वलनशील विटा शहरातील विविध हॉटेल्स आणि मोठ्या स्वयंपाक गृहांमध्ये ज्वलनशील इंधन म्हणून वापरल्या जातात. या कंपनीत सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ब्रिक्सच्या कारखान्यात अचानक आग लागली. यामुळे खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर धूर कारखान्यातून बाहेर निघू लागला लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पण आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने ही आग कारखान्याच्या बाजूला असलेल्या गोदामात पसरली नाही. या गोदामात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि तयार माल साठवलेला होता. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याबे मोठे नुकसान होण्यापासून टळले. मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना एमआयडीसी परिसरात घडत आहेत. एकीकडे व्यापार अडचणीत येत आहे. तेच मागील काही महिन्यात दोन मोठ्या कंपनी ज्यामध्ये फर्निचर कंपनी आणि विको कंपनीचे आगीत मोठे नुकसान झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details