नागपूर - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र वाढत्या कोरोनावर संपूर्ण लॉकडाऊन हा काही पर्याय होऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडतो, गरिबांचे त्यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे लॉकडाऊन लावण्यात येऊ नये, अशी मागणी आम्ही पालकमंत्र्यांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमच्या मागणीला पालकमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आयोजित बैकठीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊन ऐवजी वाटल्यास कडक नियम तयार करावे आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी आम्ही यावेळी पालकमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आता नव्या नियमांची घोषणा अधिकृतरित्या पालकमंत्री करतील. लसीकरण केंद्र वाढवण्याबद्दल देखील यावेळी चर्चा झाल्याचे फडवणीस यांनी सांगितले आहे.