महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Blast In Nagpur : नागपूर जीपीओ पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये स्फोट

जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एक स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. नाशिकहून आलेल्या एका पार्सलमध्ये जनावरांना भीती दाखवण्यासाठी असलेले छोटे सौम्य प्रभावाचे स्फोटक त्यामध्ये पाठवण्यात आले होते. यात या स्फोटकाची संख्या जवळपास दहा असून त्यातील एका स्फोटकाचा स्फोट झाला. ( Explosion at Parcel Hub of Nagpur GPO Post Office )

Blast In Nagpur
पार्सलहबमध्ये स्फोट

By

Published : Jun 14, 2022, 8:14 PM IST

Updated : Jun 14, 2022, 9:03 PM IST

नागपूर - जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एक स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. ( Explosion at Parcel Hub of Nagpur GPO Post Office ) नाशिकहून आलेल्या एका पार्सलमध्ये जनावरांना भीती दाखवण्यासाठी असलेले छोटे सौम्य प्रभावाचे स्फोटक त्यामध्ये पाठवण्यात आले होते. यात या स्फोटकाची संख्या जवळपास दहा असून त्यातील एका स्फोटकाचा स्फोट झाला. पार्सल हाताळताना हा स्फोटक फुटल्यामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली होती. ( Blast In Nagpur )

प्रतिनिधीने घटना स्थळावरून घेतलेला आढावा

नाशिक येथून एका पोलीस निरीक्षकाने हे स्फोटके पार्सलने वर्धा येथील भाजपचे पदाधिकारी असलेले राजेश बकाने यांना पाठवले होते. स्फोटक अगदी सौम्य स्वरूपाचे असून जनावरांना भीती दाखवण्यासाठी किंवा त्यांना पळवून लावण्यासाठी वापरला जात असतात. हेच पार्सल आज नाशिकवरून नागपूरच्या जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले. यावेळी पार्सल हाताळत असताना अचानकपणे त्यातील एक छोटा स्फोट हा फुटल्याने खळबळ माजली. यावेळी तात्काळ पोलिसांना माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस हे जीपीओ पोस्ट ऑफिस येथे घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी बॉम्ब पथकाला पाचारण केले. बॉम्बशोधक पथकाने याची तपासणी केल्यावर यामध्ये छोट्या फटाक्याचा स्वरूपाचा आवाज असल्याची सल्फर आणि फॉस्फरस मिश्रित स्फोटक असल्याची माहिती त्यांना मिळाली. यात या स्फोटक हे एअरगनच्या साह्याने फोडत असल्याचेही समोर आले आहे.

सहायक पोलीस आयुक्त म्हणाले - या सगळ्यांमध्ये मिळालेले सौम्य स्वरूपाचे जवळपास अर्धा किलोचे हे पार्सल होते. त्यामध्ये मिळून आलेल्या स्फोटक याची चौकशी केली जाईल. त्यामुळे कुठल्या पदार्थाचा किती प्रभावाचे आणि धोकादायक असलेले ज्वलनशील पदार्थ होते. त्याची तपासणी केली त्याची त्यानंतर यामध्ये पार्सलमध्ये अशा स्वरूपाचे पाठवत असताना कुठल्या नियमाचा भंग झाला. याबाबत सर्व माहिती सर्व बाबींची तपासणी करून त्यानंतरच कारवाई केली जाईल. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त निलेश पालवे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

यासंदर्भात संबंधित पार्सल पाठवणार अशी आणि पार्सल घेणार अशी दोघांची पोलिसांनी संवाद साधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जनावरांसाठी करताना भीती दाखवण्यासाठी यांच्या माध्यमातून फायर करण्यासाठी वापरात असणारे फटाक्याच्या प्रभावाचे हेच कोटके आहे. याचा वापर करून पक्ष्यांना जंगली जनावरांना शेती पिकाचे नुकसान करतात. त्यांना पळवण्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पत्रव्यवहार होत असताना पाहिले. आज मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पाठवणाऱ्या व्यक्ती पोलीस निरीक्षक असल्याचा सुद्धा पार्सलवर लिहिलेल्या प्रेशकमध्ये असून नाशिकला कार्यरत आहे. तेच पार्सल स्वीकारणारे हे वर्ध्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे समजतय. त्यामुळे अशा जबाबदार व्यक्तीने पोस्ट ऑफिसच्या पार्सलमधून अशा पद्धतीचे पदार्थ पाठवणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

हेही वाचा -Bunker To Raj Bhavan Revolutionary Gallery : बंकर ते क्रांतीकारकांची प्रेरणा गाथा सांगणारी गॅलरी; पाहा Video

Last Updated : Jun 14, 2022, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details