महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Exam Fever 2022 : नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा होणार ऑनलाइन आणि ऑफलाइन - तुकडोजी महाराज विद्यापीठ उन्हाळी परीक्षा बातमी

Exam Fever 2022 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ( Rashtrasant Tukdoji Maharaj University Nagpur ) उन्हाळी परीक्षेचं ( Nagpur University Summer Exam ) स्वरूप अखेर ठरलं आहे. यंदाची उन्हाची परीक्षा ऑनलाइन तसेच ऑफलाइन अश्या मिक्स मोड ( Nagpur University Summer Exam Pattern ) पद्धतीने देता येणार आहे.

Exam Fever 2022
नागपूर विद्यापीठ

By

Published : Apr 22, 2022, 4:44 PM IST

Updated : Apr 22, 2022, 5:30 PM IST

नागपूर-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ( Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University ) उन्हाळी परीक्षेचं ( Nagpur University Summer Exam ) स्वरूप अखेर ठरलं आहे. यंदाची उन्हाची परीक्षा ऑनलाइन तसेच ऑफलाइन अश्या मिक्स मोड ( Nagpur University Summer Exam Pattern ) पद्धतीने देता येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा दोन्ही पद्धतीने -मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे तर, ३० जूनपर्यंत परीक्षा संपविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि व्हायवा ठरल्याप्रमाणेच करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. नवीन वेळापत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना ५ मेपर्यंत परीक्षा अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विद्यापीठाने २५ एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे ठरले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता नागपूर विद्यापीठाने परीक्षेचा मुहूर्त ठरवला आहे. त्याच बरोबर विद्यार्थी परीक्षा मिक्स मोड म्हणजेच ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने देऊ शकणार आहेत. सुरुवातीला ऑनलाइन परीक्षा होईल, त्यानंतर ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश -यावर्षीची उन्हाळी परीक्षा ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी आणि सर्वच विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. याकरिता विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. या शैक्षणिक सत्रातील अभ्यास ऑनलाइन झाला असल्याने विद्यापीठाची परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याची मागणी विद्यार्थी केली होती.

हेही वाचा-Rana vs Shivsena : 'बंटी-बबलीला पोहचू द्या! मुंबईचे पाणी त्यांना माहीत नाही'

Last Updated : Apr 22, 2022, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details