महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'जनतेची सहानुभूती मिळविण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न' - bjp agitation news

भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पानिपत होण्याच्या धास्तीने त्यांना आतापासूनच घेरले आहे, त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून अशाप्रकारची आंदोलने केली जात आहेत, अशी टीका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

nitin
nitin

By

Published : Feb 5, 2021, 5:20 PM IST

Updated : Feb 5, 2021, 5:32 PM IST

नागपूर - जनतेचा भाजपावरील विश्वास उडाला असल्याने स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. विधान परिषद निवडणूक असो की ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पानिपत होण्याच्या धास्तीने त्यांना आतापासूनच घेरले आहे, त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळावी म्हणून अशाप्रकारची आंदोलने केली जात आहेत, अशी टीका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

करण्याचा केविलवाणा खटाटोप

पुढे ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर केंद्र शासन व भाजपा पूर्णपणे तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारचे सर्वच आघाडीवरील अपयश, चीनसमोर पत्करलेली शरणागती, देशाच्या आर्थिक स्थितीमुळे जनतेत असलेला रोष यावरून लक्ष वेधण्यासाठी भाजपा वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्ये आणि आंदोलने करण्याचा केविलवाणा खटाटोप करीत आहे.

चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न

राज्याच्या एकंदर स्थितीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून विकासासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

Last Updated : Feb 5, 2021, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details