महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोंडवाना एक्सप्रेसच्या एसी कोचमधून अमली पदार्थांची तस्करी, विशाखापट्टनम येथून भोपाळला चालवला होता गांजा

गाडी क्रमांक 12409 गोंडवाना एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून अमली पदार्थाची वाहतूक ( Drug trafficking ) असल्याची माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने गोंडवाना एक्स्प्रेसची तपासणी सुरू केली, तेव्हा एसी कोचच्या B-3 मध्ये मध्ये 02 निळ्या रंगाच्या ट्रॉली आणि 01 सॅग, 01 छोटी बॅगमध्ये गांजाची वास येत होता.

Drug smuggling from AC coach of Gondwana Express
गांजा तस्कराला अटक

By

Published : Mar 7, 2022, 10:47 AM IST

Updated : Mar 7, 2022, 4:07 PM IST

नागपूर- नागपूर रेल्वे स्थानकावर ( Nagpur Railway Station ) उभ्या असलेल्या गोंडवाना एक्स्प्रेसच्या ( Gondwana Express ) एसी कोचमधून 42 किलो 130 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरपीएफ ( Railway Protection Force ) कडून एसी कोचची नियमित तपासणी सुरू असताना दोन ट्रॉली बॅग आणि दोन छोट्या बॅग बेवारस स्थितीत आढळून आल्या होत्या. या बॅगच्या संदर्भात विचारपूस केली असता कुणीही बॅगवर हक्क सांगत नसल्याने आरपीएफच्या पथकाने कसून चौकशी सुरू केली, तेव्हा एका व्यक्तीची संशयाच्या आधारे विचारपूस केली तेव्हा, त्याने बॅग त्याचीच असल्याचे कबूल केले. या बॅगमध्ये गांजा असल्याची त्याने माहिती दिली. आरपीएफने आरोपीला ताब्यात घेऊन गांजा जप्त करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक 12409 गोंडवाना एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून अमली पदार्थाची वाहतूक ( Drug trafficking ) असल्याची माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने गोंडवाना एक्स्प्रेसची तपासणी सुरू केली, तेव्हा एसी कोचच्या B-3 मध्ये मध्ये 02 निळ्या रंगाच्या ट्रॉली आणि 01 सॅग, 01 छोटी बॅगमध्ये गांजाची वास येत होता. प्रवास करणाऱ्यांची विचारपूस केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर देऊन आरपीएफ पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा त्याची कसून चौकशी केली तेव्हा आरोपीने आपला गुन्हा मान्य केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 4 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

भोपाळ येथे करणार होता विक्री
आरोपीने गांजा हा विशाखापटनम येथून खरेदी केला असून, मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे विक्रीसाठी घेऊन जातं असल्याची माहिती आरपीएफला दिली आहे.

Last Updated : Mar 7, 2022, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details