नागपूर -नागपुरातील गड्डीगोदाम येथील मूळचे रहिवासी असलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री यशवंत निकोसे यांच्या घराची ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. मागील तीन महिन्यांत तीन अर्ज करूनही प्रश्न सुटलेला नाही. माजी मंत्री आणि बहुजन समाज पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते राहिलेली व्यक्ती नागपूर महानगरपालिकेतील अधिकारी - कर्मचाऱ्यांकडे वारंवार विणवणी करत असतानाही त्यांची समस्या सोडवली जात नाही, तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय स्थिती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा -'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका
नागपुरातील जुनी आणि आताच्या घडीला स्लम भाग झालेली वस्ती म्हणून गड्डीगोदामची ओळख झाली आहे. घर आणि लोकांची संख्या वाढली. पण वस्तीत नवीन कामे झाली नाहीत. जुनी ड्रेनेज लाईन सध्या कायमची डोकेदुखी होऊन बसली आहे. पण सामान्य वाटत असलेल्या या समस्येला उत्तर प्रदेशच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांना मागील तीन महिन्यांपासून या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पण मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
काय आहे समस्या जाणून घ्या -
गड्डीगोदाम दाटीवाटीची वस्ती असल्याने समस्यांचे माहेरघर ठरत आहे. रस्ते अरुंद, लहानलहान बोळी, जुनी वस्ती असल्याने ड्रेनेज लाईनही जुनीच आहे. ना नाल्या, ना सुविधा यामुळे ड्रेनेज लाईन चोक झाली की सांडपाणी घरासमोर वाहते. यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी हे दैनंदीन जीवनाचा भाग बनले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. ही समस्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला नाही तर माजी मंत्र्याला भोगावी लागते. यशवंत निकोसे हे उत्तर प्रदेशच्या मायावती सरकारमध्ये 2007 ते 2012 या कालावधीत कॅबिनेट दर्जाचे मंत्री असून, सांस्कृतिक खाते त्यांच्याकडे होते.
दिवस उजाडताच सहन करावा लागतो त्रास
यशवंत निकोसे हे ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी 3 महिन्यांपासून मनपाता चकरा घालत आहेत. लाईन चोकअप झाल्याने रोज दिवस उजाडताच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वयाच्या 70 व्या वर्षात असतानासुद्धा त्यांना नागपूर मनपा प्रशासनाकडे चकरा माराव्या लागत आहेत. या तीन महिन्यात तीन अर्ज केले, अनेकदा कार्यालयात चकरा मारल्यात पण फंड नसल्याचे कारण त्यांना सांगितले जात आहे.
हेही वाचा -दीदी बोले 'खेला होबे' बीजेपी बोले 'विकास होबे'; मोदींचा ममतांवर हल्लाबोल
अर्ज करूनही दुर्लक्षच; मस्या जैसे थे