महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Oxygen Storage in Nagpur : कोरोना दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या मागणी पेक्षा दुप्पट ऑक्सिजन नागपुरात उपलब्ध

नागपुरात दर दिवसाला कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 4 ते 5 हजारांच्या घरात पोहचली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण (Oxygen Plant in Nagpur) होऊ नये यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या (Nagpur Health Department) मदतीने नागपुरात ऑक्सिजनचा साठा (Oxygen Storage) वाढवण्यावर भर दिला जात आहे.

By

Published : Jan 28, 2022, 5:55 PM IST

Updated : Jan 28, 2022, 6:06 PM IST

oxygen plant
ऑक्सिजन प्लांट

नागपूर - उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Nagpur Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. केवळ 27 दिवसांमध्ये संसर्गदर हा 50 टक्क्यांजवळ गेला आहे. दर दिवसाला कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 4 ते 5 हजारांच्या घरात पोहचली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण (Oxygen Plant in Nagpur) होऊ नये यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या (Nagpur Health Department) मदतीने नागपुरात ऑक्सिजनचा साठा (Oxygen Storage) वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रति दिवशी 445 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती, मात्र, आता नागपूरमध्ये 736 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय जयस्वाल यांनी दिली आहे.

माहिती देताना आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल

हेही वाचा -ऑक्सिजनचा नवीन स्रोत वाढविण्याची तयारी सुरू

  • दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा जाणवला तुटवडा -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचे महत्त्व हे सर्वांनाच पटलेले आहे. ऑक्सिजन अभावी लाखो लोकांचा नाहक बळी गेला होता. सगळीकडे नुसती ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव होत होती. मात्र, प्रत्येकाला ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची शासन आणि प्रशासनाची कोणतीही तयारी नसल्याने अनेकांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रियजनांचा जीव जाताना बघितला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशाची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता पुन्हा तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये याकरिता आरोग्य विभाग प्रशासनाने नागपुरात आवश्यकते पेक्षा दुप्पट ऑक्सिजनचा साठा उपलब्ध केला आहे. दुसऱ्या लाटेत एका रुग्णास दर मिनिटाला कमीतकमी १० तर जास्तीत जास्त ७० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागत होता. ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली होती. यामुळे मोठा तुटवडा पडला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तशी परिस्थिती नाही.

  • 736 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध:-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठया प्रमाणात निर्माण झाला होता. तिसऱ्या लाटेत ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत. सध्या नागपूर विभागात ‘पीएसए’चे २६ प्लांट निर्माण करण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यात 445 मेट्रिक ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यामुळे आता 736 मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी हवेतून ऑक्सिजन शोसून घेण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा -नागपूर : ट्रान्स्पोर्ट व्यसायिकांच्या प्रयत्नांमुळे ऑक्सिजन पुरवठ्याचा मार्ग सुकर

Last Updated : Jan 28, 2022, 6:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details