नागपूर -राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येच घोटाळा प्रकरणातून क्लीन चीट मिळाली आहे, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. त्यावेळी ते निष्कलंक असल्याचे सिद्ध झाले होते का? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
हेही वाचा... एकनाथ खडसेंचं ठरलं... म्हणाले लवकरच पक्षांतर!
अजित पवार हे कोणत्याही घोटाळा प्रकरणात सहभागी नाहीत. हे भाजपला माहित होते, त्यामुळेच त्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केले. त्यामुळे आता अजितदादांवर बोलण्याचा फडणवीसांना नैतिक अधिकार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.