नागपूर -विधानमंडळाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी बांधवासोबत ठेका धरला. झिरवाळ यांच्या नृत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी देखील नृत्यात सहभाग घेतला होता.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे नृत्य नागपूर विधानमंडळ परिसरात आजपासून वर्षभर कार्यान्वित असणाऱ्या सचिवालयाचे उद्घाटन पार पडले. यासाठी नरहरी झिरवाळ नागपुरात आले होते. यावेळी विधानसभा चौकात आदिवासी संघटनांकडून झिरवाळ यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यावेळी झिरवाळ यांनी देखील नृत्याचा ठेका धरला होता.
उद्घाटन कार्यक्रमासाठी नरहरी झिरवाळ नागपुरात -
नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे दरवर्षी होत असते. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर नागपूर येथील विधानमंडळ सचिवालयात कोणतेही कामकाज होत नाही. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेत या ठिकाणी वर्षभर कार्यरत असणारा कायस्वरुपी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कक्षाचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा आज पार पडला. त्याकरिता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नागपुरात आले असताना त्यांनी हे नृत्य कौशल्य दाखवले आहे.