महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय - Nagpur Corona Latest News

आजपासून नागपुरात संचारबंदीच्या नियमांमध्ये प्रशासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करत, नागरिकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत सुरू राहावेत आणि त्यांचे अर्थचक्र फिरते रहावे यासाठी संचारबंदीच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.

नागपुरात संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय
नागपुरात संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय

By

Published : Mar 22, 2021, 7:56 PM IST

नागपूर -आजपासून नागपुरात संचारबंदीच्या नियमांमध्ये प्रशासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करत, नागरिकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत सुरू राहावेत आणि त्यांचे अर्थचक्र फिरते रहावे यासाठी संचारबंदीच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.

उपराजधानी नागपुरात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल वीस हजारांनी वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात संचारबंदी लावण्यात आली होती. मात्र संचारबंदी असताना देखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत होते, त्यामुळे या आठवड्यात आणखी कडक संचारबंदी होईल असा अंदाज होता. मात्र नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने आजपासून नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुरात संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय

'संचारबंदीमुळे सर्वसामान्य लोकांचे हाल'

गेल्या आठवड्यात नागपुरात संचारबंदी लावल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल झाले. संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे, अशा लोकांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होते. अशा लोकांचा विचार करूनच, संचारबंदीमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details