नागपूर - कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अजूनही बंदच आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महामंडळ बस सेवा व महानगरातील बस सुरू करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 'डफली बजाओ आंदोलन' करण्यात आले. नागपूरातील मोरभवन बस स्थानकासमोर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागातील एसटी सेवा १५ ऑगस्टपर्यंत पूर्णतः सुरू करा, अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली. शिवाय सरकार विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आले.
कोरोनामुळे सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवा अजूनही बंदच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी सेवा व महानगरातील बस सेवा सुरू करा, या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडी तर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. नागपूरातही बस सेवा तात्काळ सुरू करा या मागणीसाठी मोरभवन बसस्थानकासमोर 'डफली बजाओ' आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आले. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत डफडी वाजवण्यात आल्या.
वंचित बहुजन आघाडीकडून डफली बजाओ आंदोलन-नागपूर शहर हेही वाचा -ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?
बस सेवा सुरू करून सर्वसामान्यांना न्याय द्या, अशा घोषणाही या आंदोलनात देण्यात आल्या. शिवाय सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने सर्सामान्यांची खासगी वाहनाकडून लुट केली जात आहे. ती तात्काळ थांबवावी. शिवाय सरकारला लोकांचा विश्वास उजागर करायचे असेल तर सम विषमचा झोल तात्काळ थांबवा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंतरजिल्हा वाहतूक सेवा सुरू करून लोकांना दिलासा द्या, असेही आंबेडकर यांनी सांगितले. त्याचबरोबर जिथे ३००-४०० रूपये वाहतूक भाड असायला पाहिजे, तिथे खासगी वाहनाकडून हजारो रूपये घेतले जात आहे. ही लुट सरकारकडूनच केल्या जात असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
शिवाय बस सेवा सुरू राहिल्या असत्या तर लोकांची लुट झाली नसती. त्यामुळे शासनाने लवकर वाहतूक सेवेचा एसओपी तयार करा, अशी मागणीही आंबेडकरांनी केली. त्याचबरोबर जर शासन १५ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा व आंतरजिल्हा सेवा सुरू केले नाही, तर सर्व बंधने तोडण्याचे आंदोलन आम्ही सुरू करू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. असे असले तरी या आंदोलनादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे तिन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले.