नागपूर - शहरात बनावट फेसबुक अकाऊंट बनवून प्रतिष्ठित व्यक्तींना मनस्ताप देण्याच्या नवीनच प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. यात नागपुरातील तीन प्रतिष्ठित व्यक्तिंच्या बाबतीत हा प्रकार मागील महिन्याभरात घडल्याचे पुढे आले आहे. यात नागपूरच्या सायबर पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापरत करतांना सावधानता बाळगण्याची गरज आहे. यात तक्रारीची संख्या कमी वाटत असली तरी बदनामीमुळे अनेक जण पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. यामुळे जास्त फॅन फॉलोविंग असणाऱ्या व्यक्तीच्या नावे फेसबुक या सोशल साईटवर बनावट अकाऊंट बनवून 'एस्कॉर्ट सर्व्हिस'ची जाहिरात केली जात आहे. ज्यामध्ये सेक्स रॅकेट सुद्धा चालावले जात असल्याची शंका पॉलिसांकडून व्यक्त होत आहे. नागपुरात उघडकीस आलेल्या प्रकरणात या तीन व्यक्तीमध्ये एक जण नामांकित कंपनीत आहे, एक सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत तर तिसरे हे सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांच्या नावाने उघडलेल्या बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह मजुकर असल्याचे त्यांना ओळखीच्या लोकांनी कळवले, तेव्हा तिघांनाही धक्का बसला आणि त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली.
सायबर गुन्हेगार या नवीन पद्धतीने लोकांना जाळ्यात ओढण्याचे काम करत आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचे फेक अकाऊंटवर जिगेलो, एसकॉर्ट सर्व्हिस देण्यासाठी हायप्रोफाईल व्यक्तीच्या फोटो वेगळे आणि धड वेगळे वापरून फोटो एडिट केले जातात. त्यानंतर त्यावर मोबाईल नंबर देऊन फोन करायला लावतात. मग यात आंबट शौकीनाना फोनवर गुंतवले जातात. पैशे दिले तर एसकॉर्ट सर्व्हिसच्या नावावर वाटेल ते पुरवण्याचे आमिष देत त्यांना जाळ्यात ओढले जाते. या तिन्ही तक्रारीच्या बाबतीत फेक आयडीचा वापर कसा झाला याचा शोध सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
तरुण तरुणीना पैशाचे आमिष..