महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मास्क न घालणाऱ्या नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींवर मनपाची दंडात्मक कारवाई, राज्यातील पहिलीच कारवाई - नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मास्क न घालणाऱ्या एका नवरदेवासह चार वऱ्हाडी मंडळीवर दंडात्मक कारवाई केली आहे. भारतनगर येथील नैवेद्यम सभागृहात ही कारवाई करण्यात आली आहे.

corporations-punitive-action
corporations-punitive-action

By

Published : Jun 30, 2021, 10:36 PM IST

नागपूर - नागपूर महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मास्क न घालणाऱ्या एका नवरदेवासह चार वऱ्हाडी मंडळीवर दंडात्मक कारवाई केली आहे. भारतनगर येथील नैवेद्यम सभागृहात ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या नवरदेवावर कारवाई करण्यात आली आहे, ते नागपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक असल्याने त्यांचे नाव सार्वजनिक करण्यास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक झोनमध्ये असलेल्या लग्न सोहळ्यात जाऊन त्याठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत आहे की, नाही या संदर्भात तपासणी करत आहेत. ज्या अंतर्गत नागपूरसह राज्यात पहिल्यांदाच एखाद्या नवरदेवावर मास्क न घातल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नवरदेवासह चार तीन पाहुण्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली असून प्रत्येकांकडून पाचशे रुपये असा दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे या सारख्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात होते एवढंच नाही तर नवरदेव आणि तीन वऱ्हाडी वळगळता इतरांनी मास्क घातलेला होता हे विशेष.

चार लग्न सोहळयांवर कारवाई करत ५० हजारांची दंड वसूल -

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका प्रशासनाने अलर्ट मोडवर काम सुरू केले आहे. नव्या नियमानुसार सोमवारपासून प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहेत, त्यानुसार पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत ५० हजारांचा दंड वसूल केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details