नागपूर - नागपुरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये किराणा, भाजी विक्रीची दुकाने, मास-मटणाची दुकाने आता केवळ एक वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. पूर्वी हे दुकान दिवसभर सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र या दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे निदर्शनात येताच मनपा आयुक्तांनी नवे आदेश दिले आहेत. मात्र या नव्या आदेशामुळे आणखी गर्दी वाढणार, अशी शक्यता दुकानदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गर्दी टाळण्यासाठी केलेल्या नव्या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्णवाढीचा धोका? - nagpur corona new rules
पूर्वी हे दुकान दिवसभर सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र या दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे निदर्शनात येताच मनपा आयुक्तांनी नवे आदेश दिले आहेत.
अनेक उपाययोजना करूनही गर्दी कमी नाही
नागपूर शहरात झपाट्याने कोरोनारुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसातच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वीस हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे समूहसंसर्ग होण्याचा धोकादेखील वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गेल्या आठवड्यात आढावा बैठक घेऊन शहरात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत काही दुकानांना मुभा देण्यात आली होती. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेसोबतच भाजी, फळ, किराणा आणि मास मटणाचे दुकान सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली होती. अनेक उपाययोजना केल्यानंतरही बाजारात गर्दी होत कमी झालेली नसल्याने आता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ही दुकाने केवळ एक वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.