महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

४५ वर्षापुढील नागरिकांसाठी रविवारी लसीकरण सुरू; 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी आता 9 केंद्र - रविवारी कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू

४५ वर्षावरिल नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. ज्या नागरिकांचे दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

४५ वर्षापुढील नागरिकांसाठी रविवारी लसीकरण सुरू
४५ वर्षापुढील नागरिकांसाठी रविवारी लसीकरण सुरू

By

Published : May 9, 2021, 7:42 AM IST

नागपूर - शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. शहराकरीता राज्य शासनाच्या कोट्यातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचच्या सुविधेकरीता एकूण 96 केंद्रामधून लसीकरण करण्यात येईल. हे लसीकरण आजपासून (रविवार 9 मे) सुरू होणार आहे.

तर 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण 9 केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे. ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.

दुसऱ्या डोससाठी प्राधान्य-

जोशी म्हणाले की, ४५ वर्षावरिल नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. ज्या नागरिकांचे दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी आता 9 केंद्र सुरू आहेत. यामध्ये कोव्हॅस्किन लस दिली जाणार आहे.

हे लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू, राजकुमार गुप्ता समाज भवन, बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, NIT ग्राउंड जवळ, मनीष नगर, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल,व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा येथे कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात येईल.

ऑनलाइन नोंदणी अनिवार्य:-

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details