नागपूर- इंदिरा गांधी शासकीय मेयो रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुरू केले कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याची भूमिका घेतली. सुमारे दोनशे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आंदोलनात सहभागी असून, सर्व कर्मचारी हे बीव्हीजी या खाजगी कंपनीचे कर्मचारी आहेत.
वेतन न मिळाल्याने मेयो रुग्णालयातील दोनशे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत, शिवाय मेयोमध्ये कोरोना संशयितांचे विलगीकरण आणि कोरोना आजाराती चाचणी करण्यात येत असल्याने या रुग्णालयात स्वच्छतेला अधिक महत्व दिले जात आहे. मात्र, दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत.
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत, शिवाय मेयोमध्ये कोरोना संशयितांचे विलगीकरण आणि कोरोना आजाराती चाचणी करण्यात येत असल्याने या रुग्णालयात स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले जात आहे. मात्र, दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कंत्राटी सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मेयो रुग्णालयातील सफाईचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात लॉक डाऊन असल्याने या कर्मचाऱ्यांच्या घरातील इतर सदस्य बेरोजगार झाल्याने घराचा गाडा हाकणे कठीण झाल्याने नाईलाजास्तव कामबंद आंदोलन पुकारावे लागले आहे.