नागपूर- बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी शिवसेनने फारकत घेतली, तरच पुढच्या राजकारणाचा विचार केला जाईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे. सेना- भाजपमध्ये सरकार स्थापनेवरुन सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नसून, जोपर्यंत सेना यातून बाहेर पडत नाही; तोपर्यंत काँग्रेसला यामध्ये कोणताही रस नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
अद्याप आमच्याकडे सेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसून, उभयतांमध्ये चर्चा होईपर्यंत आम्हाला पुढचे पाऊल टाकता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेना व काँग्रेसच्या विचारसरणीत अंतर असल्याचेही राऊत यांनी अधोरेखित केले आहे.